Investment In Real Estate: फक्त ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या,रिअल इस्टेटमधील गुंतवणूक बनवेल तुम्हाला कोट्याधीश, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
real estate

Investment In Real Estate:- सध्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे व त्यातल्या त्यात रिअल इस्टेटमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे सध्या चित्र असून गेल्या काही वर्षापासून रियल इस्टेट क्षेत्राचे भाव देखील गगनाला गवसणी घालत आहेत.

परंतु गुंतवणूक कोणत्याही पर्यायांमध्ये करायची ठरली तर थोडीफार जोखीम ही येते व त्यामुळे तुम्ही कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करत असाल तर त्याविषयीची संपूर्ण माहिती घेणे व रिसर्च करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे ही काळाची गरज आहे. आज रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये जर पाहिले तर नफा भरपूर आहे

परंतु प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी किंवा त्यामध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची माहिती घेणे गरजेचे असते. तरच तुम्हाला रिअल इस्टेटमधील गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. नाहीतर फायदयाऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते.

 रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करा परंतु या गोष्टींवर लक्ष द्या

1- प्रॉपर्टीचे लोकेशन पहा रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर योग्य लोकेशनची निवड करणे गरजेचे असते. तुम्ही जी ही प्रॉपर्टी खरेदी करत आहात त्या मालमत्तेचे किंवा प्रॉपर्टीचे लोकेशन हे फार महत्त्वाचे असते व यावरूनच तुमच्या प्रॉपर्टी चे मूल्य ठरत असते. तुम्ही जर चांगल्या परिसरामध्ये प्रॉपर्टी घेतली तर तिची किंमत जास्त असू शकते.

मात्र तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये मालमत्ता घ्यायची नसेल त्या ठिकाणी किंमत कमी असू शकते. त्यामुळे बिल्डर मालमत्तेचे मूल्य ठरवताना लोकेशन अगोदर पाहतात व या गोष्टींची तुलना करूनच किंमत ठरवतात. त्यामुळे लोकेशन पाहूनच प्रॉपर्टी खरेदी करणे गरजेचे असते.

2- प्लॅन बनवताना अगोदर ध्येय पहा तुमचे गुंतवणुकीचे नेमके ध्येय काय आहे हे अगोदर ठरवणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे व त्यातून तुम्हाला ताबडतोब नफा हवा आहे की दीर्घकाळ भाड्यामधून म्हणजेच रेंट मधून स्थिर उत्पन्न मिळवायचे आहे? या गोष्टीचा विचार करणे खूप गरजेचे आहे.

या गोष्टी पाहिल्यानंतर मग तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची तयारी निश्चित करता येते. यामध्ये चांगला निर्णय घेण्याची आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्याची तुमची जी काही क्षमता असते ती तेव्हाच योग्य ठरते जेव्हा तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या ध्येयावर काम करतात.

3- पैशांचा बजेट पाहणे आवश्यक जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा आपला पैशांचा बजेट बसवणे खूप गरजेचे असते. तुम्ही गुंतवणूक करताना किती पैशांची गुंतवणूक करू शकतात हे नेमकेपणाने तुम्हाला माहिती पाहिजे.

जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा पैशांचा फ्लो कोणत्या पद्धतीने ठेवावा लागेल हा देखील प्लान तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. त्यामुळे पैशांची पूर्ण प्लॅनिंग करूनच तुम्ही रियल इस्टेट क्षेत्रात उतरल्यास तुम्हाला जास्त अडचण येत नाही.

4- योग्य धोरण ठरवावे रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही गुंतवणूक का करत आहात याचे धोरण बनवणे आवश्यक आहे. या धोरणामध्ये तुम्ही तुमची गुंतवणुकीची उद्दिष्ट तसेच जोखीम आणि उपलब्ध असलेल्या साधनांचा विचार करणे गरजेचे आहे. सध्या मार्केटचा कल कसा आहे आणि आर्थिक परिस्थिती इत्यादी गोष्टींचा विचार करणे देखील गरजेचे आहे.

5- योग्य मार्गदर्शन घ्यावे रिअल इस्टेट मधील गुंतवणूक जोखमीची देखील असू शकते व त्यामुळे जोखीम कमी करण्याकरिता काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही या क्षेत्रातील जाणकाराचा सल्ला घेणे खूप फायद्याचे ठरू शकते.

रियल इस्टेट क्षेत्र जितके सोपे दिसते तितके मात्र नाही. त्यामुळे जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

6- सुरुवात करा परंतु छोट्या स्वरूपात तुम्ही या क्षेत्रामध्ये नवीनच उतरत असाल तर मात्र एक किंवा दोनच मालमत्ता घ्याव्यात. म्हणजेच तुम्हाला जर नुकसान झाले तरी ते टाळता येऊ शकते किंवा त्यातून अनुभव घेऊन जास्त नुकसान न होता पुढे नेटाने या क्षेत्रात विकास करता येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe