Konkan Tourist: पावसाळ्यात कुटुंब आणि मित्रांसोबत कोकणात जा फिरायला! कोकणातील ‘ही’ स्थळे पहा आणि स्वतःला फ्रेश करा

Ajay Patil
Published:
dapoli beach

Konkan Tourist:- महाराष्ट्र म्हटले म्हणजे निसर्ग सौंदर्याची समृद्ध खाण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात तसेच कोकण किनारपट्टी निसर्गाने समृद्ध असून या ठिकाणी असलेले अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेली स्थळे तसेच गडकिल्ले, कोकणातील विस्तीर्ण समुद्रकिनारा, औरंगाबाद जिल्ह्यात असलेली पर्यटन स्थळे तसेच विदर्भातील अनेक पर्यटन स्थळांचा आपल्याला यामध्ये समावेश करता येईल.

परंतु खास करून जर आपण यामध्ये कोकणाचा विचार केला तर या ठिकाणी समुद्रकिनारा तर आहेच परंतु नारळ, पोफळीची बागा तसेच निसर्ग सौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळे आपल्याला पाहायला मिळतात.

यामुळे दरवर्षी देश विदेशातील लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. पावसाळ्यामध्ये खास करून या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते. त्यामुळे या पावसाळ्यात तुमचा देखील कोकणात फिरायला जायचा प्लॅन असेल तर तुम्ही येथील काही ठिकाणांना भेट देणे खूप गरजेचे आहे व याच महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती या लेखात घेणार आहोत.

 ही आहेत कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे

1- कशेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कशेळी नावाचे गाव असून या गावात कनकादित्य हे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे भारतात असलेले जे काही सूर्याची सात मंदिरे आहेत त्यापैकी हे मंदिर एक आहे. हे मंदिर पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक या ठिकाणी भेट देतात. त्यामुळे तुम्ही देखील या पावसाळ्यात कशेळी येथे जाऊन कणकादित्य मंदिर पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून रिक्षाने जाऊ शकतात.

2- तारकर्ली समुद्रकिनारा तारकर्ली समुद्रकिनारा हा पर्यटकांसाठी उत्तम समुद्रकिनारा असून या ठिकाणी स्कुबा डायविंग व इतर पाण्यातील खेळ म्हणजेच वॉटर स्पोर्टचा आनंद घेता येतो. या ठिकाणी जर तुम्हाला यायचे असेल तर तुम्ही मडगाव रेल्वे स्टेशन वरून एसटीने किंवा रिक्षेने येऊ शकतात.

3- दापोली भारतातील हे एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय असे ठिकाण असून मुंबईपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. या ठिकाणी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात व या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही एसटीने जाऊ शकतात किंवा खाजगी वाहन भाड्याने घेऊन देखील जाऊ शकता. दापोली समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकतात.

4- श्रीवर्धन कोकणातील जे काही समुद्रकिनारे आहेत त्यामध्ये श्रीवर्धनचा समुद्रकिनारा हा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याजवळ समजाई मंदिर आहे व ते तब्बल 200 ते 250 वर्षांपूर्वीचे आहे असे म्हटले जाते. जर तुम्हाला कोकणामध्ये कुटुंबासमवेत किंवा मित्रांसमवेत फिरायचे असेल तर तुम्ही श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याला भेट देणे गरजेचे  आहे.

5- थिबा राजवाडा कोकणामध्ये समुद्रकिनाऱ्या व्यतिरिक्त आणि चांगली अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत व यातील जे प्रसिद्ध स्थळ जर आपण पाहिले तर ते म्हणजे थिबा राजवाडा होय. हा राजवाडा पुरातन गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध असूनही बऱ्याच पुरातन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe