पावसाळ्यात धबधबा पहायचा असेल तर पहा नगर जिल्ह्यातील ‘हा’ धबधबा; सलमानच्या ‘मै जब जब तुझको पुकारू’ या गाण्याची झाली होती शूटिंग

Ajay Patil
Published:

पावसाळ्याच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नदी नाल्यांसोबतच अनेक धबधबे देखील प्रवाहित होतात व त्यामुळे निसर्गाचे स्वरूप आणखीनच खुलून दिसते. या निसर्गाचे खुललेले रूप पाहण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणांना या कालावधीत भेटी देतात.

महाराष्ट्र म्हटला म्हणजे अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाणांची एक खाणच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात दरवर्षी पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात गर्दी होताना पाहायला मिळते.

या अनुषंगाने तुम्हाला देखील या पावसाळ्यामध्ये एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी जायची इच्छा असेल तर तुम्हाला धबधबा पहायचा  असेल तर तुमच्यासाठी भंडारदरा येथील नेकलेस फॉल म्हणजे रंधा धबधबा खूप महत्त्वाचा ठरेल.

 रंधा धबधबा करतो पर्यटकांना आकर्षित

महाराष्ट्र मध्ये जे काही धबधबे आहेत त्यामध्ये भंडारदरा येथील रंधा धबधबा अर्थात नेकलेस फॉल पर्यटकांना या कालावधीत खूप आकर्षित करतो व या धबधब्याचे जर आपण एक वैशिष्ट्य पाहिले तर या ठिकाणी सलमान खानच्या कुर्बान या चित्रपटातील मै जब जब तुझको पुकारू या सुपरहिट गाण्याचे देखील शूटिंग येथेच पार पडले होते.

यावरून आपल्याला या धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य लक्षात येते.समजा पुणे व मुंबईकरांना जर रंधा धबधबा पाहायला यायचे असेल तर साधारणपणे पुणेकरांना त्यासाठी 156 किलोमीटर अंतर पार करावे लागेल तर मुंबईकरांना साधारणपणे 177 किलोमीटरच्या अंतर पार करून भंडारदरा येथील हा नेकलेस फॉल अर्थात रंधा धबधबा पाहता येणे शक्य आहे.

साधारणपणे भंडारदराचा परिसरच एक निसर्गाने समृद्ध असून या ठिकाणी तुम्हाला रंधा धबधबाच नाही तर अनेक निसर्ग समृद्ध अशी ठिकाणी पाहता येतात. या ठिकाणची पसरलेली हिरवाई आणि अंगाला  हवीहवीशी वाटणारी गार मंद वाऱ्याची झुळूक देखील मनाला मोहून टाकते.साधारणपणे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा या ठिकाणापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर हा नेकलेस फॉल अर्थात रंधा धबधबा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या प्रवरा नदीच्या डोंगरांमधून हा धबधबा  प्रवाहित होतो व साधारणपणे 50 मीटर उंचीवरून खाली कोसळतो व हे दृश्य डोळ्यात भरणारे असते.

जर आपण या धबधब्याचे एक सिनेमा सृष्टीतील महत्त्व पाहिले तर या ठिकाणी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांची शूटिंग धबधब्याच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात होते. पावसाळ्यामध्ये या ठिकाणाचे सौंदर्यामध्ये आणखीनच मोठ्या प्रमाणावर भर पडते व म्हणून मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe