Rural Business Idea:- बेरोजगारीचा प्रश्न हा भारतापुढील एक ज्वलंत असा प्रश्न असून बेरोजगारीच्या समूळ उच्चाटनासाठी सरकारच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारचे पावले उचलण्यात येत आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पदवीधर बाहेर पडतात.परंतु त्यामानाने नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्याने अनेक तरुण आता व्यवसायाकडे वळत आहेत.
बेरोजगारीचा प्रश्न शहरी भागच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने आता तरुणांना व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नाही व व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे.
त्यामुळे आता बरेच तरुण व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. अगदी या अनुषंगाने तुम्ही देखील ग्रामीण भागात राहत असाल आणि तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याबाबतीत गोंधळ उडतो की कोणता व्यवसाय सुरू करावा? त्यामुळे आपण या लेखात ग्रामीण भागात करता येतील व त्यासाठी कमीत कमी गुंतवणूक लागेल अशा काही व्यवसायांची थोडक्यात माहिती बघणार आहोत.
ग्रामीण भागात कमी गुंतवणुकीत करता येतील हे व्यवसाय
1- मसाल्याचा बिजनेस- प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरामध्ये आपल्याला मसाले पाहायला मिळतात आणि मसाल्या शिवाय भारतीय आहार पूर्णच होऊ शकत नाही अशी एकंदरीत स्थिती आहे.
त्यामुळे मसाल्याच्या व्यापाराला किंवा व्यवसायाला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. या दृष्टिकोनातून मसाल्यांचा व्यापार करणे हे ग्रामीण भागातील तरुणांना एक उत्तम अशी संधी ठरू शकते.
या व्यवसायामध्ये गुंतवणूक कमी असते व त्याबरोबर मागणी जास्त असल्याकारणाने पैसे देखील जास्त कमावता येतात. शहरी भागच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील मसाल्यांना प्रचंड मागणी असल्यामुळे ग्रामीण भागातील तरुण मसाल्याचा व्यापार करून चांगले पैसे मिळवू शकतात.
2- तेलाचा व्यवसाय- खाद्यतेलाशिवाय कुठलाही स्वयंपाक पूर्ण होऊ शकत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. त्यामुळे तेलाची मागणी पाहता ग्रामीण भागामध्ये तेलाचा व्यापार करणे खूप फायद्याचे ठरू शकते.
भारतीय जेवणामध्ये तेलाला विशेष स्थान असल्यामुळे तेलाचा व्यापार करणे उत्तम ठरेल. हा व्यवसाय देखील तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत सुरुवातीला छोट्या स्तरावर सुरू करून कालांतराने त्याचा विस्तार करू शकतात.
3- कॉर्न फ्लेक्सचा व्यवसाय- ग्रामीण भागामध्ये कॉर्नफ्लेक्सला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे व खूप मोठ्या आवडीने कॉर्न फ्लेक्स खाल्ले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात हा व्यवसाय करणे खूप फायद्याचे ठरू शकते.
हॉटेल्स तसेच मोठमोठे रेस्टॉरंट, अगदी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ढाब्यांमध्ये सुद्धा कॉर्न फ्लेक्सचा वापर केला जातो व त्यामुळे या वाढत्या मागणीचा फायदा घेत कॉर्नफ्लेक्सचा व्यवसाय सुरू करणे फायद्याचे ठरू शकते.
4- लोणचे किंवा चटणी बनवण्याचा व्यवसाय- भारतीय आहारामध्ये चटणी आणि लोणच्याचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. लोणच्याची जर चव चाखायची असेल तर ती ग्रामीण भागातील लोणच्याला जास्त प्रमाणात असते.
दुसरे म्हणजे चटणी बनवण्याचे देखील विविध प्रकार ग्रामीण भागातील लोकांना माहीत असल्याने शहरी भागातील लोक गावाकडील चटणी आणि लोणचे मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.
त्यामुळे लोणची किंवा चटणी बनवण्याचा व्यवसाय तुम्ही ग्रामीण भागात सुरू करू शकतात व कमीत कमी गुंतवणूक करून उत्तम नफा या माध्यमातून मिळवू शकतात.
बेकरी व्यवसाय- ग्रामीण भाग असो की शहरी भाग या ठिकाणी बेकरी व्यवसाय उत्तम पद्धतीने रन होऊ शकतो. कारण सकाळी नाश्ता पासून तर पोटाला आधार म्हणून देखील अनेक बेकरी उत्पादने खाल्ले जातात व यामध्ये बटर, पाव तसेच टोस्ट किंवा खारी इत्यादी बेकरी उत्पादनांना मोठी मागणी आहे.
तसेच दररोज कोणाचा तरी वाढदिवस हा असतोच व या सगळ्यामुळे देखील बेकरी उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे अशा प्रकारचे मागणी लक्षात घेऊन संधीचे सोने या व्यवसायाच्या माध्यमातून करता येऊ शकते.
घरामधून एक छोटीशी बेकरी सुरू करून तुम्ही व्यवसाय करू शकतात व कालांतराने त्यामध्ये वाढ करू शकतात. घरातल्या घरात तुम्ही बेकरी उत्पादने तयार करून उत्तम दरात आणि उत्तम कॉलिटीमध्ये विक्री करून चांगला नफा या माध्यमातून मिळवू शकतात.