Car Care Tips:- उंदीर हा असा प्राणी आहे की तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी फायदा तर कुठलाही प्रकारचा होत नाहीच परंतु नुकसान अगणित करत असतो. घरामध्ये राहिला तर धान्याची पोती किंवा कपडे इत्यादी कुरतडून खराब करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर उंदरांच्या माध्यमातून केले जाते व धान्याची नासाडी देखील यामुळे होते.
तसेच शेतामध्ये देखील उंदरांचा सुळसुळाट झाला तर पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणावर होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. याच्याही पुढे जात उंदीर वाहनांसाठी देखील खूपच त्रासदायक असल्याचे आपल्याला दिसून येते. आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा कार सारख्या इतर वाहनांमध्ये उंदीर आत घुसतात व कारचे वायरिंग व इतर महत्त्वाचा भाग कुरतडतात व यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

विशेष म्हणजे पावसाळ्याचा कालावधीमध्ये अशा उंदरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढतो व कार मध्ये घुसण्याचे प्रमाण देखील वाढू शकते. कारण पावसाळ्यामध्ये सुरक्षित जागा शोधण्याच्या प्रयत्नात उंदीर कार वगैरे व इतर वाहनांमध्ये घुसतात व त्या ठिकाणी वायरिंग तोडून त्याचे नुकसान करत असतात.त्यामुळे या लेखामध्ये आपण कार मध्ये उंदीर घुसूच नये याकरिता त्याचे उपाय व उंदीर कारमध्ये का घुसतात याची कारणे बघणार आहोत.
कारमध्ये या कारणांमुळे उंदीर घुसू शकतात?
1- खाण्याचे पदार्थ कारमध्ये ठेवू नये– आपण जेव्हा बऱ्याचदा कारमधून प्रवास करतो तेव्हा वेफर्स किंवा इतर खाद्यपदार्थ कार मध्ये घेत असतो व ते खात असतो व उरलेले पदार्थ तसेच कारमध्ये ठेवतो. परंतु असे कधीही खाद्यपदार्थ कारमध्ये ठेवू नये.
खाद्यपदार्थ कारमध्ये असले तर त्या अन्नाचा वास उंदीरांना आकर्षित करतो आणि त्यांची कारमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढते. याकरिता कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ कधीही सोडून देऊ नये.
2- अंधाऱ्या ठिकाणी कार पार्क करू नये– पावसाळ्यामध्ये पाणी भरल्यामुळे बिळे नाहीसे होतात. सुरक्षित निवारा शोधण्यासाठी उंदीर अंधाऱ्या जागी प्रामुख्याने राहत असतात. कारण अंधाऱ्या जागी त्यांचे मांजर किंवा इतर भक्षकांपासून संरक्षण होते.
या परिस्थितीमध्ये जर का कारण अंधारात पार्क केलेली असेल तर त्यांना ती लपण्यासाठी उत्तम पर्याय ठरते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी गाडी पार्क कराल त्या ठिकाणी किमान शून्य वॉटचा बल्ब लावावा. ज्यामुळे गाडीत उंदीर शिरणार नाही किंवा त्यांची शक्यता कमी होते.
3- तंबाखूची पाने– तंबाखूची पाने कार सुरक्षित ठेवण्यासाठी खूप फायद्याचे ठरतात. कारच्या इंजिन जवळ किंवा कारच्या डिक्कीमध्ये तुम्ही वाळलेल्या तंबाखूची पानांची पुडी ठेवली तर या तंबाखूच्या पानांचा वास उंदरांना सहन होत नाही व त्या गाडीत प्रवेश करू शकत नाहीत. जर गाडीमध्ये ते असतील तर पटकन निघून जातात.
4- रॅट रिपेलेंट स्प्रे– बाजारामध्ये किंवा ई-कॉमर्स वेबसाईटवर रॅट रिपेलेंट स्प्रे कमी किमतीमध्ये आपल्याला मिळतात. या प्रकारचा स्प्रे कारमध्ये केला तर उंदीरांचा प्रवेश होणार नाही याची खात्री आपल्याला मिळते. फक्त लहान मुले असतील तर सावधानता बाळगून हा स्प्रे वापरावा.
5- रॅट रिपेलेंट यंत्र– तसेच ज्याप्रमाणे ई-कॉमर्स वेबसाईटवर तुम्ही उंदीर मारण्यासाठी चा स्प्रे घेऊ शकता तसे उंदीर मारणारे यंत्र देखील किंवा मशीन देखील तुम्हाला मिळतात. हे मशीन थोडे किमतीने जास्त असते परंतु तुम्हाला शंभर टक्के प्रभावी उपाय योजना या माध्यमातून मिळते.
फक्त हे उपकरण तुम्हाला कारच्या इंजिन जवळ बसवावे लागते व ते मेकॅनिक बसवून देतो. जेव्हा हे मशीन सुरू केले जाते तेव्हा त्या माध्यमातून अल्ट्रासोनिक आवाज तयार होतो व तो उंदीर सहन करू शकत नाही. आवाजामुळे उंदीर कारच्या बाहेर पडतात.