file photo

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. देशात तसेच विदेशात सर्वात लोकप्रिय नेते असणारे नरेंद्र मोदींविषयी सामान्य लोकांना माहित नसणाऱ्या गोष्टी आणि त्यांची कुंडली काय सांगते हे जाणून घेऊयात.

PM Narendra Modi Kundli 

१७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला होता. बालपणी त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती हालाखीची होती.

मात्र, या खडतर परिस्थितीशीवर मात करत त्यांनी जीवनाच्या विविध टप्प्यावर यश मिळावीत पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतली. ज्योतिशास्त्रानुसार नरेंद्र मोदी यांची कुंडली बाल गंगाधर टिळक यांच्याशी मिळती-जुळती आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सगळ्या टीका आणि आरोपांवर शरसंधान करत पुन्हा एकदा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुमत मिळवलं. पंतप्रधान मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले.

पंतप्रधान मोदींची कुंडली बरंच काही सांगते. पंतप्रधान मोदी यांचं भाग्य देखील त्यांच्यासोबत आहे. याबाबत ज्योतिषाचार्य डॉ. अजय भांबी, बेजान दारूवाला आणि अंक शास्त्री डॉ. कुमार गणेश यांनी माहिती दिली आहे,

पंतप्रधान मोदींच्या कुंडलीमध्ये जे ग्रह नक्षत्र आहेत. त्यानुसार पंतप्रधान मोदींनी पराभूत करणं इतकंही सोपं नाही. ते अनेक वर्ष विजयाच्या रथावर विराजमान राहतील असं त्यांच्या कुंडलीवरुन दिसत आहे.

पीएम नरेंद्र मोदी यांची वृश्चिक रास आहे. वृश्चिक राशीचं चिन्ह विंचू आहे. विंचू हा संवेदनशील आहे.मात्र त्यांची लोकप्रियता अधिक असली तरी त्यांनाही आगामी काळ कठीण असणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.

विंचू हा आत्मविश्वासाने पुढे जातो. पंतप्रधान मोदी देखील संपूर्ण आत्मविश्वासाने निर्णय़ घेतात. टीकाकारांना उत्तर देण्याचं काम देखील पंतप्रधान मोदी एका वेगळ्या अंदाजात करतात. ते जे ठरवतात तेच करतात अशी त्यांची वृत्ती आहे.

वृश्चिक राशीचे व्यक्ती गंभीर आणि निडर असतात. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राहणारे लोकं देखील असेच सांगतात की, मोदी हे महत्त्वाचे निर्णय अतिशय बिनधास्तपणे घेतात.

जगभरात पंतप्रधान मोदींनी तयार केलेला संपर्क आणि दबदबा ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे.वृश्चिक राशीचे लोकं मेहनती असतात. ते शत्रूंचा देखील निडरपणे सामना करतात. पंतप्रधान मोदींच्या बाबतीत देखील ही गोष्ट दिसते.