Indian Bank Recruitment 2023 : भारतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी आहेत. यासोबतच लाखो विद्यार्थी बँकिंग एक्सामही देत असतात. दरम्यान बँकिंग परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे इंडियन बँकेत काही रिक्त जागांसाठी नुकतीच भरती आयोजित झाली आहे.
यामुळे बँकेत काम करू इच्छिणाऱ्या, बँकिंग परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधीच राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, इंडियन बँकेच्या माध्यमातून कॅश मॅनेजमेंट सर्विसेसमधील स्पेशलिस्टच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
विशेष बाब म्हणजे उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या रिक्त जागासाठी भरती?
बँकेच्या कॅश मॅनेजमेंट सर्विसेस मधील स्पेशलिस्टच्या प्रोजेक्ट मॅनेजर, टीमलीड आणि चार्टर्ड अकाउंटंट या पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरला जाणार आहेत.
किती रिक्त जागांसाठी आहे भरती?
प्रोजेक्ट मॅनेजर पाच रिक्त जागा, टीम लीड सात रिक्त जागा आणि चार्टर्ड अकाउंटंट 6 रिक्त जागा अशा एकूण 18 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरण्याचे नियोजन बँकेचे आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बँकेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली अधिसूचना एकदा निश्चितच काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
अर्ज कुठं करावा लागणार
indianbank.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक व्यक्तींनी आपला अर्ज सादर करायचा आहे. तसेच या पदांसाठीचे अर्ज मुख्य महाव्यवस्थापक (CDO & CLO), इंडियन बँक कॉर्पोरेट ऑफिस, एचआरएम विभाग, भरती विभाग 254-260, अवाई शानपुगाम सालाई (Avvai Shanmugam Salai), रोयापेटाह, चेन्नई, तमिळनाडू, पिन कोड – 600 014 येथे पाठवायचे आहेत.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक
इंडियन बँकेत निघालेल्या पदभरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 29 मे 2023 आहे. सहाजिकच इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज या विहित तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरून वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. विहित कालावधीनंतर सादर झालेल्या अर्जावर कोणत्याही परिस्थितीत विचार होणार नाही याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे.