तरुणांसाठी आनंदाची बातमी ! इंडियन ऑइल मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Oil Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आम्ही रोजच सरकारी नोकर भरतीची माहिती घेऊन हजर होत असतो. दरम्यान सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

इंडियन ऑईल मध्ये एक मोठी भरती निघाली आहे.इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिडेटने विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. दरम्यान आज आपण या भरती बाबत सर्व आवश्यक ती माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 2 महत्वाचे जीआर जारी, आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना…..

कोणत्या पदासाठी होणार भरती?

इंडियन ऑइलने जूनियर इंजिनियर असिस्टंट या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती काढली आहे.

किती जागांसाठी होणार भरती?

अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार या पदाच्या एकूण 65 रिक्त जागा या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी संबंधित विषयातील तीन वर्षाचा डिप्लोमा केलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचणे जरुरीचे राहणार आहे.

वयोमर्यादा

किमान 18 आणि कमाल 28 वय असलेले उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत. तसेच रिजर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार सुट राहणार आहे. याबाबत अधिक माहिती जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- पंजाब डख नवीन अंदाज; आजपासून ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार, काही भागात गारपीट देखील होणार, पहा काय म्हणताय डख

अर्ज कसा करावा लागणार

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main_special_sep21.aspx या लिंक वर जाऊन उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

उमेदवाराला आपला अर्ज 30 मे 2023 पर्यंत सादर करता येऊ शकतो. यानंतर मात्र उमेदवाराला आपला अर्ज सादर करता येणार नाही.

जाहिरात कुठे पाहणार?

या पदभरतीची जाहिरात पाहण्यासाठी https://iocl.com/admin/img/UploadedFiles/LatestJobOpening/Files/c7ab954527c648cdb1afe68c7046901a.pdf या लिंक वर क्लिक करा. 

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; अभ्यास समिती जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीच्या वयाबाबत शासनाला देणार ‘हा’ अहवाल?