Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

आठवी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! भारतीय पोस्टात निघाली विविध पदासाठी भरती, मुंबईत असणार नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Indian Post Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्या तरुणांना भारतीय पोस्टात नोकरी करण्याची आस असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाची पर्वणी राहणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण की, भारतीय पोस्टाने नुकतीच एक भरती आयोजित केली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून पोस्टात विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.

या भरतीच्या माध्यमातून मेल मोटर सर्विस मुंबई या ठिकाणी रिक्त झालेली पदे भरली जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे यासाठीची अधीसूचना देखील भारतीय पोस्टाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे.

दरम्यान आज आपण कोणत्या रिक्त पदांसाठी भरती होणार आहे, किती पदे भरली जातील, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत यांसारख्या बाबींची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! पंजाब डख यांनी ‘या’ जिल्ह्यात वर्तवली मुसळधार पावसाची शक्यता, पहा….

कोणत्या अन किती पदांसाठी होणार भरती?

मेकॅनिक (मोटार वाहन): 3 पदे, मोटार वाहन इलेक्ट्रिशियन: 2 पदे, वेल्डर: 1 पोस्ट, टायरमन: 1 पोस्ट, टिनस्मिथ: 1 पोस्ट, पेंटर: 1 पोस्ट, लोहार: 1 पोस्ट अशा एकूण दहा रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

वर नमूद करण्यात आलेल्या पदासाठी उमेदवार किमान आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

यासोबतच उमेदवाराकडे संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

तसेच संबंधित उमेदवाराला किमान एका वर्षाचा संबंधित ट्रेड मधील कामाचा अनुभव असणे जरुरी आहे.

वयोमर्यादा

वर नमूद करण्यात आलेल्या सर्व पदासाठी अर्ज करू इच्छीणारा उमेदवार 18 ते 30 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :- मुंबईमधील चाकरमान्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एक्सप्रेस ट्रेनबाबत रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता…..

किती पगार मिळणार

हाती आलेल्या माहितीनुसार या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १९९०० रुपये प्रति महीना मानधन दिल जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

यासाठी उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवाराला विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून आपला अर्ज व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, जीपीओ कंपाउंड, सिव्हिल लाइन्स, नागपूर-४४००१ या पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक

13 मे 2023 पर्यंत पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकणार आहेत. विहित कालावधीनंतर सादर झालेल्या अर्जावर कोणत्याही परिस्थितीत विचार होणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे.

हे पण वाचा :- चिंताजनक ! हवामानात झाला मोठा बदल; बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाची शक्यता, ‘या’ तारखेला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता