Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

तरुणांसाठी खुशखबर ! पोस्टात ‘या’ पदाच्या 15,000 जागेसाठी होणार मेगा भरती; विना परीक्षा थेट 10वी च्या मिरीटवर होणार निवड, आजच इथं अर्ज करा

Indian Post Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी ही आनंदाची बातमी राहणार आहे. कारण की भारतीय पोस्टात पंधरा हजार जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या पदभरतीच्या माध्यमातून ग्रामीण डाक सेवक अंतर्गत येणाऱ्या ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी केवळ दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत.

विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही पद्धतीची लेखी परीक्षा आयोजित राहणार नाही. या पदासाठी उमेदवाराची निवड थेट दहावीच्या गुणांच्या मेरिट लिस्टच्या आधारावर केली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- 12वी पास, पदवीधरांसाठी आनंदाची बातमी! भाभा अनुसंशोधन केंद्रात ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती, आजच करा अर्ज

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?

ग्रामीण डाक सेवक अंतर्गत ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

या पदाच्या 15000 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी किमान दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. गणित आणि इंग्रजी या विषयांसह दहावी पास उमेदवार यासाठी पात्र राहतील. सोबतच उमेदवाराला कम्प्युटरच बेसिक नॉलेज असणे अनिवार्य आहे. यासाठी शासनमान्य कोर्स केलेला असणे जरुरीचे आहे. एम एस सी आय टी हा कोर्स यासाठी पात्र राहणार आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी 18 ते 40 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. सोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट देखील दिली जाणार आहे.

हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात झाली मोठी वाढ; कोणत्या राज्यात किती DA? वाचा…

किती पगार राहणार?

शाखा पोस्ट मास्टर म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 12000 ते 29 हजार 380 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे.

तसेच असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 10 हजार ते 24 हजार 470 रुपये एवढे वेतन राहणार आहे.

अर्ज कसा करायचा आहे

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. https://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?

या भरतीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 11 जून 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.

जाहिरात कुठं पाहणार

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इंडियन पोस्टल रिक्रुटमेंट 2023 या लिंक वर क्लिक करा. 

हे पण वाचा :- मुंबईतल्या घराचं स्वप्न म्हाडाकडून होणार पूर्ण ! Mhada च्या 4 हजार 83 घरांच्या लॉटरीची A टू Z माहिती वाचा एका क्लिकवर