Indian Railway Rule: रेल्वेमध्ये तुमच्या आरक्षित सीटवर दुसरे कोणी बसल्यास सीट मिळवण्यासाठी कुठे करावी तक्रार? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railway Rule:- भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांकरिता अनेक सुविधा पुरविल्या जातात व अनेक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष पुरवले जाते. बऱ्याच व्यक्ती लांबचा प्रवास करण्यासाठी रेल्वेची निवड करतात.

परंतु ट्रेनमध्ये आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की तुम्ही जे सीट आरक्षित म्हणजेच रिझर्व केलेले असते त्या सीटवर दुसरेच व्यक्ती येऊन बसलेले असते किंवा त्याने ताबा मिळवलेला असतो. याप्रसंगी तुम्ही सीट रिझर्व करून देखील तुम्हाला बसायला जागा मिळत नाही.

अशावेळी खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण जर रिझर्व केलेल्या सीटवर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने ताबा मिळवला तर काय करावे? त्याबद्दलचे महत्त्वाचे माहिती घेऊ.

 तुमच्या आरक्षित सीटवर दुसऱ्या प्रवाशीने ताबा मिळवला तर काय करावे?

भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना चांगल्यात चांगल्या सुविधा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. आता ट्विटरच्या माध्यमातून देखील रेल्वे प्रवाशांना मदत करण्यासाठी पुढे आलेली आहे. रेल्वेच्या बाबतीत अनेक महत्त्वाची कामे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करता येतात.

यामध्ये ट्रेनचे तिकीट काढण्यापासून ते ट्रेनमधील जेवणापर्यंत सर्व काही तुम्ही ऑनलाईन माध्यमातून आता ऑर्डर करू शकता. परंतु यामध्ये आपल्याला बऱ्याचदा अनुभव येतो की ट्रेनमध्ये प्रवास करत असताना  तुमची बुक केलेली सीटवर दुसरा कोणता तरी व्यक्ती येऊन बसतो व तो ते सीट द्यायला तयार नसतो.

उलट तो आपल्याला दुसरे सीट अड्जस्ट करण्याचा सल्ला देखील देतो. अशाप्रसंगी तुम्ही थेट रेल्वे कडे तक्रार करून तुमची सीट रिकामी करून त्यावर तुम्ही बसू शकतात. याकरिता तुम्हाला सर्वात अगोदर याबाबतची तक्रार टीटीई(TTE) कडे देणे गरजेचे असते. परंतु जर अशावेळी टीटीई त्या ठिकाणी उपलब्ध नसतील तर तुम्ही Rail madad या एप्लीकेशन वर तक्रार नोंदवू शकतात. याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करणे गरजेचे आहे.

यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो आणि सेंड ओटीपी यावर क्लिक करावे लागते. त्यानंतर मिळालेला ओटीपी तुम्हाला टाकून तुमचा पीएनआर नंबर टाकावा लागेल. पी एन आर नंबर टाकल्यानंतर टाईप वर क्लिक करा आणि तुमची तक्रार निवडा व तारखेची देखील निवड करा. त्यानंतर तुमची तक्रार व्यवस्थित डिटेल्स मध्ये लिहावी आणि सबमिट बटणावर क्लिक करावे. अशा साध्या पद्धतीने तुम्ही तुमची तक्रार रेल्वे पर्यंत पोहोचवू शकतात.

 रेल्वे हेल्पलाइन नंबरवर तक्रार नोंदवा

तसेच अशाप्रसंगी तक्रार नोंदवण्याचा दुसरा पर्याय म्हणजे याबाबतची आपण ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतो व टीटीई कडे याबाबतची तक्रार नोंदवू शकतो. परंतु काही प्रसंगी या दोन्ही सुविधा तुम्हाला वापरणे शक्य नसेल तर तुम्ही 139 या रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात व तुमच्या समस्याचे निराकरण करू शकतात.

अशाप्रकारे जर तुमच्या आरक्षित सीटवर कोणी ताबा मिळवला तर तुम्ही ते सीट परत मिळवू शकतात.