Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

रेल्वेचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांना रेल्वेच तिकीट मिळणार फ्री, ‘त्यां’च्या नातेवाईकांना पण मिळणार लाभ, पहा…..

Indian Railway Ticket Scheme : भारतात रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी विशेष आहे. रेल्वेमार्गे प्रवास हा जलद आणि किफायतशीर असल्याने या प्रवासाला कायमच प्रवाशांची पसंती लाभते.

Indian Railway Ticket Scheme : भारतात रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी विशेष आहे. रेल्वेमार्गे प्रवास हा जलद आणि किफायतशीर असल्याने या प्रवासाला कायमच प्रवाशांची पसंती लाभते. विशेषता लांब पल्ल्याचा प्रवास रेल्वेने लवकर होत असल्याने रस्ते मार्गे जाण्याऐवजी रेल्वेनेच प्रवास करण्यावर अनेकांचा मदार असतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय रेल्वे देखील आपल्या प्रवाशांसाठी अनेक सुविधा पुरवत असते. यामध्ये रेल्वे प्रवाशांना वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. तसेच इतरही अनेकतिकीट दरात देखील सवलत रेल्वेच्या माध्यमातून दिली जाते. दिव्यांगांना आणि ज्येष्ठांना भारतीय रेल्वेमध्ये तिकीट दरात सूट मिळते.

या व्यतिरिक्त अन्य काही लोकांना देखील भारतीय रेल्वे सूट देते. भारतीय रेल्वे कडून काही रोगाने ग्रस्त पेशंटला व त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रवासामध्ये तिकीट दरात सूट मिळते. मात्र काही ठराविक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाच फक्त रेल्वे तिकीट दरात सवलत मिळत असते. अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या आजाराने ग्रस्त असलेल्या पेशंटला रेल्वेमध्ये प्रवास करताना तिकीट दरात सवलत मिळत असते याविषयी जाणून घेणार आहोत.

या आजाराने ग्रस्त पेशंटला मिळते सूट

कॅन्सरने ग्रस्त असलेल्या पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी रेल्वेमध्ये प्रवास करतांना सूट मिळते. या पेशंटला एसी चेअर कारमध्ये 75%, AC-3 आणि स्लीपरमध्ये 100 टक्के आणि फर्स्ट क्लास, सेकंड एसी क्लासमध्ये 50 टक्के तिकीट दरात सवलत दिली जात असते.

थॅलेसेमिया, हृदयरोगी, किडनी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी जाताना AC-3, AC चेअर कार, स्लीपर, सेकंड क्लास, फर्स्ट एसीमध्ये 75 टक्के तिकीट दरात सूट भारतीय रेल्वेकडून दिली जाते.

संसर्ग नसलेल्या कुष्ठरोगांना, टीबी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी जाताना सेकंड, स्लीपर आणि फर्स्ट क्लासच्या तिकीट दरांमध्ये 75 टक्के तिकीट दरात सवलत मिळत असते.

HIV असलेल्या लोकांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना देखील उपचारासाठी जाताना सेकंड क्लास मध्ये 50% तिकीट दरात सवलत मिळते.

निश्चितच भारतीय रेल्वेने दिलेली ही सुविधा या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी खूपच दिलासा देणारी आहे. यामुळे या रुग्णांना उपचार घेताना आर्थिक दिलासा निश्चितच मिळू शकणार आहे.