Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

2025 पर्यंत सुरू होणार ‘हे’ पाच महामार्ग; महाराष्ट्रातील समृद्धी अन जगातील सर्वाधिक लांबीच्या ‘या’ महामार्गाचा पण आहे समावेश, पहा….

Indias Longest Expressway : आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. साहजिकच या येणाऱ्या निवडणुका सत्ता पक्षासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः रस्ते विकासाची कामे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या देखरेखेखाली युद्धपातळीवर सुरू आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजनांतर्गत संपूर्ण हिंदुस्थानात ग्रीन फील्ड कॉरिडॉर विकसित केले जात आहेत. याव्यतिरिक्त इतरही अनेक महत्त्वाच्या मार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान 2025 पर्यंत देशात एकूण पाच महामार्ग सुरू केले जाणार आहेत. या महामार्गांची कामे आता अंतिम टप्प्यात आली असून लवकरच या महामार्गाची भेट देशवासी यांना मिळणार आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्राशी संबंधित दोन महामार्गांचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग तयार होत आहे. हो बरोबर ऐकलंत आपण जगातील सर्वाधिक लांबीचा मुंबई दिल्ली महामार्ग आपल्या राज्याच्या राजधानीला आणि देशाच्या राजधानीला कनेक्ट करणारा सर्वाधिक लांबीचा महामार्ग राहणार आहे. दरम्यान आज आपण 2025 पर्यंत नेमकी कोण-कोणती महामार्गे बांधून तयार होतील आणि याचा प्रवाशांना फायदा होईल याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- काय सांगता ! फक्त ‘ही’ तीन कामे केली की लगेचच सुधारतो सिबिल स्कोर, पहा कोणती आहेत ही कामे?

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग

राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक, हा महामार्ग दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातल्या महामार्ग प्रकल्पांपैकी एक आहे. हेच कारण आहे की, या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी गेल्या वर्षी सुरू करण्यात आला आहे. हा एक महाराष्ट्रासाठी गेम प्रोजेक्ट सिद्ध होत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या महामार्गाचे काम नियोजित वेळेत होत आहे. दरम्यान या महामार्गाचा उर्वरित टप्पा अर्थातच शिर्डी ते मुंबई हा देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा मानस शासनाचा आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जोमात प्रयत्न सुरू असून यापैकी बहुतांशी काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सुरुवातीचा 520 किलोमीटरचा टप्पा या आधी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला असून 85 किलोमीटरचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला असून शासनाच्या मान्यतेनंतर हा देखील टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महामार्गाचा उर्वरित टप्पा म्हणजेच शिर्डी ते मुंबई या वर्ष अखेर सुरू करण्याचा मानस प्राधिकरणाचा आहे. अर्थातच डिसेंबर 2023 पर्यंत हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग संपूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; धानाच्या ‘या’ नवीन जाती ठरतील फायदेशीर, मिळणार अधिक उत्पादन

मुंबई दिल्ली महामार्ग

हा महामार्ग केवळ देशातीलच नाही तर जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. त्यामुळे या महामार्गाच्या विशेष चर्चा रंगत आहेत. मार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची राजधानी यांना जोडणारा हा महामार्ग आहे. मुंबई हे शहर औद्योगिक दृष्ट्या अति महत्त्वाचे शहर आहे शिवाय हे एक ग्लोबल टाउन आणि ग्लोबल पर्यटन स्थळ म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. हेच कारण आहे की मुंबईला राजधानी दिल्लीशी कनेक्ट करण्याचा मोटो शासनाने डोळ्यापुढे ठेवला आणि या महामार्गाची आता उभारणी सुरू आहे.

काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दिलेल्या माहितीनुसार हा महामार्ग 2025 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. या मार्गाची आणखी एक मोठी विशेषता म्हणजे या मार्गामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर मात्र 12 तासात पार करता येणार आहे. सध्या स्थितीला दिल्ली ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 24 तासांचा कालावधी लागतो. अर्थातच या महामार्गाच्या उभारणीनंतर जगातील दोन सर्वाधिक महत्त्वाची शहरे थेट रस्ते मार्गाने जोडली जाणार आहेत. निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टीने हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा असून यामुळे देशाच्या एकात्मिक विकासाला साधता येणार असल्याचा दावा तज्ञ लोक देखील करत आहेत.

हे पण वाचा :- ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज रात्रीपासून ‘हा’ महत्त्वाचा मार्ग राहणार ‘इतके’ दिवस बंद, पर्यायी मार्ग कोणता? पहा….

बेंगळुरू-चेन्नई द्रुतगती मार्ग

महाराष्ट्रासह इतरही राज्यात अनेक महामार्गाची कामे सध्या युद्ध पातळीवर सुरु आहेत. यामध्ये बेंगलोर चेन्नई महामार्गाचा देखील समावेश आहे. खरं पाहता दक्षिण भारतातील जनतेसाठी हा महत्त्वाचा महामार्ग असून यामुळे दक्षिण भारतातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या मार्गाची एकूण लांबी 260 किमी असेल. निश्चितच लांबीने हा महामार्ग समृद्धी महामार्ग आणि मुंबई दिल्ली महामार्गाच्या तुलनेत कमी असला तरी देखील या मार्गामुळे दोन महत्त्वाची राज्य परस्परांना जोडली जाणार आहेत. हेच कारण आहे की हा देखील महामार्ग देशातील प्रमुख महामार्गांच्या यादीत येत आहे.

हा चार पदरी द्रुतगती मार्ग बेंगळुरू ते चेन्नईला जोडेल. हा राष्ट्रीय महामार्ग कर्नाटकातील होस्कोटे आणि बंगारापेट, आंध्र प्रदेशातील पलामनेर आणि चित्तूर आणि तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूरपर्यंत जाईल. खरं पाहता कर्नाटक मध्ये येत्या काही महिन्यात विधानसभां निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम जलद गतीने करण्यासाठी आणि लोकांच्या मध्यात विकासाची कामे पोहोचवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत यामुळे हा देखील महामार्ग 2025 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- पुणे, सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-सातारा हायवेमधील रखडलेले काम ‘या’ महिन्यात होणार पूर्ण, NHI ने थेट तारीखच सांगितली

दिल्ली-अमृतसर-कठरा एक्सप्रेसवे

दिल्ली-अमृतसर-कठरा एक्स्प्रेस वे हा महामार्ग 650 किलोमीटर लांबीचा असून या मार्गामुळे देशातील तीन महत्त्वाची स्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. सर्वप्रथम ही स्थळे आध्यात्मिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या अति महत्त्वाची आहेत. सुवर्णमंदिरामुळे अमृतसर जगात ख्याती प्राप्त आहे, आता वैष्णोदेवीमुळे कटरा जगात ख्याती प्राप्त आहे, दिल्ली देशाची राजधानी आणि एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ. या सर्व पार्श्वभूमीवर या तिन्ही शहरांना जोडणारा हा महामार्ग देशातील इतर महामार्गांच्या तुलनेत अधिक चर्चेचा विषय आहे. या मार्गाचे महत्त्व देखील अधिक आहे.

हा एक्स्प्रेस वे दिल्लीतील बहादूरगड सीमेवरून जम्मूतील कटरापर्यंत बांधून तयार केला जाणार आहे. या महामार्गाची सर्वात मोठी विशेषता आणि ज्यामुळे या मार्गाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे ते म्हणजे हा एक्सप्रेसवे वैष्णोदेवी मंदिर आणि सुवर्ण मंदिरासह अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणारा आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शक्तीपीठ महामार्गाची चर्चा आहे तशीच चर्चा या महामार्गाची असून या महामार्गाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होत आहे. शक्तिपीठ महामार्ग राज्यातील जवळपास सर्वच तीर्थक्षेत्रांना जोडणारा आहे तसेच हा देखील महामार्ग देशातील काही प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारा ठरणार आहे.

गंगा एक्सप्रेस वे

नावावरूनच या महामार्गाचे महत्त्व समजल असेलच. तसेच हा महामार्ग कसा असेल याची देखील प्रचिती थोड्याफार प्रमाणात तुम्हाला आली असेल. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा महामार्ग  दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, प्रयागराज-वाराणसी एक्सप्रेसवे आणि मेरठ-हरिद्वार एक्सप्रेस वेशी जोडला जाणार आहे. हा 94 किमी लांबीचा कॉरिडॉर कव्हर करणारा 6 लेनचा एक्स्प्रेस वे राहणार आहे. या महामार्गाला देखील पर्यटनात्मक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखलं जात आहे. हा द्रुतगती मार्ग बुलंदशहर, हापूर, संभल, अमरोहा, बदाऊन, शाहजहांपूर, उन्नाव, हरदोई, रायबरेली आणि प्रतापगडसह उत्तर प्रदेशातील 12 शहरांमधून जाणार आहे.

देशातील सर्वात मोठ्या राज्यात हा महामार्ग प्रस्तावित असून हा एक्सप्रेसवे जर सर्व काही योजनेनुसार झाले तर 2025 म्हणजे महाकुंभपूर्वी तयार होईल आणि आग्रा एक्स्प्रेस वे आणि यमुना एक्स्प्रेस वेशीही जोडला जाईल असा आशावाद जाणकार लोकांच्या माध्यमातून आता व्यक्त होऊ लागला आहे. जर हा मार्ग महाकुंभ पूर्वी तयार झाला तर निश्चितच कुंभनगरीं प्रयागराजला देशभरातील सनातनी लोकांसाठी जाणं सोपं होणार आहे, प्रवास गतिमान होणार आहे. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; भोगवटदार वर्ग 2 जमिनी वर्ग 1, NA करण्याची नामी संधी; खर्च लागणार मात्र ‘इतका’, पहा अर्ज करण्याची पद्धत