देशातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रात ! ‘या’ दोन शहरातील प्रवास फक्त 15 मिनिटात, 12 किलोमीटरच्या अंतरासाठी 14 हजार कोटींचा खर्च, पहा….
Indias Longest Tunnel In Maharashtra : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहरात आणि उपनगरात वेगवेगळी विकासाची कामे केली जात आहेत. या अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण केले जात आहे.
तसेच ठाणे ते बोरिवली या शहराचे अंतर कमी करण्यासाठी भूमिगत मार्गाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. दरम्यान या ठाणे-बोरिवली टनेल रोड संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
या प्रकल्पाची निविदा म्हणजेच टेंडर हे मेघा इंजीनियरिंग या कंपनीला देण्यात आले आहे. अर्थातच आता या ठाणे ते बोरिवली दरम्यानच्या भूमिगत मार्गाचे काम येत्या काही महिन्यात सुरू होणार आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे टेंडर काढण्यात आले असले तरी देखील पाऊस पडल्यानंतरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. म्हणजेच येत्या दोन महिन्यात या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
कसा आहे प्रकल्प?
पश्चिम उपनगर बोरिवलीतील मागाठाणे येथील एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी नी वाडी दरम्यान हा टनेल रोड तयार होणार आहे. या प्रकल्पांतर्गत बोरिवली ते ठाणे दरम्यान सुमारे 5.75 किमी लांबीचा बोगदा आणि ठाणे ते बोरिवली दरम्यान सुमारे 6.1 किमी लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे.
हे दोन्ही बोगदे तीन-तीन लेनचे राहणार आहेत. म्हणजे एका बोगद्यात तीन लेन राहतील. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या उपलब्ध असलेल्या मार्गाने ठाणे ते बोरिवली दरम्यान प्रवास केल्यास एक ते दीड तासांचा कालावधी लागतो.
हे पण वाचा :- पंजाब डख यांचा तातडीचा मेसेज; आज आणि उद्या ‘या’ जिल्ह्यात गारपीट होणार, पहा संपूर्ण हवामान अंदाज
मात्र जेव्हा हे बोगदे पूर्ण होतील तेव्हा या भूमिगत मार्गाने प्रवास केला तर ठाणे ते बोरिवली हे अंतर केवळ पंधरा मिनिटात पूर्ण होऊ शकणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास चौदा हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
आता या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा मिळालेल्या कंपनीला आता काम सुरू केल्यापासून तीन वर्षात हा मार्ग पूर्ण करावा लागणार आहे. अर्थातच 2026 पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर ठाणे ते बोरिवली दरम्यान चा प्रवास आणखी सोयीचा होईल असे चित्र तयार होत आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सोयाबीन दरात झाली वाढ, पहा बाजारात काय सुरु आहे?