पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करा आणि प्रत्येक महिन्याला 9250 रुपये मिळवा! वाचा पोस्टाच्या आकर्षक योजनेची ए टू झेड माहिती

पोस्ट ऑफिसच्या योजनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम म्हणजेच एमआयएस योजना देखील खूपच महत्त्वपूर्ण योजना आहे व सुरक्षित गुंतवणूक आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून ही योजना अनन्यसाधारण अशी महत्त्वाची आहे.

Ajay Patil
Published:
post office scheme

Post Office Saving Scheme:- गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणाऱ्या परताव्याच्या दृष्टिकोनातून बँकांच्या मुदत ठेव योजनांना जितके महत्त्व आहे. तितकेच महत्त्व आता पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजनांना आणि मुदत ठेव योजनांना असल्याचे दिसून येत आहे.

पोस्ट ऑफिसच्या अनेक प्रकारच्या योजना असून त्यामध्ये गुंतवणूकदारांसाठी आकर्षक व्याजदर आणि अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे गेल्या काही वर्षापासून दिवसेंदिवस पोस्ट खात्याच्या योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.

अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंतच्या योजना पोस्ट ऑफिस राबवते. अगदी याच पद्धतीने जर पोस्ट ऑफिसच्या योजनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम म्हणजेच एमआयएस योजना देखील खूपच महत्त्वपूर्ण योजना आहे व सुरक्षित गुंतवणूक आणि मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून ही योजना अनन्यसाधारण अशी महत्त्वाची आहे.

या योजनेमध्ये जर तुम्ही एकदाच ठराविक रकमेची गुंतवणूक केली तर तुम्हाला महिन्याला नियमितपणे उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. या अनुषंगाने आपण या लेखात या योजनेची संपूर्ण माहिती बघू.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमचे स्वरूप कसे आहे?
सध्या पोस्ट ऑफिस मंथली इनकम खात्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 7.4% वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेमध्ये सिंगल अकाउंट देखील उघडता येते

व यामध्ये कमाल नऊ लाख रुपये गुंतवता येतात व जॉइंट अकाउंटच्या माध्यमातून 15 लाख रुपये जमा करता येऊ शकतात. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये सरकारची शंभर टक्के हमी असल्याने गुंतवणूकदारांची गुंतवणूक अगदी सुरक्षित राहते.

या योजनेमध्ये कुणाला अकाउंट उघडता येते?
1- प्रौढ व्यक्तीच्या नावावर सिंगल अकाउंट यामध्ये उघडता येणे शक्य आहे.
2- संयुक्त अर्थात जॉईंट अकाऊंट जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती उघडू शकतात.
3- अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर अकाउंट उघडायचे असेल तर त्याचे गार्डियन म्हणजे पालकांच्या माध्यमातून खाते उघडता येते.

खाते उघडण्यासाठी कमीत कमी किती रकमेची गुंतवणूक करणे गरजेचे आहे?
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये जर खाते उघडायचे असेल तर कमीत कमी एक हजार रुपये गुंतवणे गरजेचे आहे व नंतर 1000 रुपयांच्या पटीत म्हणजे मल्टिपल मध्ये पैसे तुम्हाला जमा करता येतात.

एकल अर्थात सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये आणि संयुक्त खात्यामध्ये पंधरा लाख रुपये तुम्ही जमा करू शकतात. जॉईंट अकाऊंटमध्ये मात्र प्रत्येक सदस्याचा गुंतवणुकीतील हिस्सा हा समान असावा लागतो.

या योजनेत मिळणाऱ्या व्याजाचे स्वरूप कसे आहे?

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.4 टक्के दराने वार्षिक व्याज मिळत आहे. तुम्ही जमा केलेल्या पैशांवर जे काही व्याज मिळते ते बारा महिन्यात विभाजित केले जाते व प्रत्येक महिन्यात आपल्या अकाउंट मध्ये येते.

जर तुम्ही महिन्याला पैसे काढले नाहीत तर पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट मध्ये ते व्याज जमा राहते आणि मुख्य रकमेच्या बरोबरीने जोडले जाऊन यावर पुढील व्याज मिळते.

या योजनेचा परिपक्वता कालावधी पाच वर्षाचा आहे. पाच वर्ष संपल्यानंतर जर तुम्हाला परत ही योजना सुरू ठेवायची असेल तर जो काही नवीन व्याजदर असेल त्यानुसार ही योजना पुढे सुरू ठेवता येते.

पंधरा लाख रुपये एकरकमी गुंतवले तर महिन्याला किती व्याज मिळेल?
पोस्ट ऑफिसच्या या मंथली इन्कम स्कीम मध्ये संयुक्त खातेधारकांना जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतात. जर 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्यावर वार्षिक 7.4% वार्षिक व्याजदर सध्या मिळत असून पंधरा लाखावर एका वर्षाचे वार्षिक व्याज एक लाख 11 हजार रुपये इतके होते.

जर तुम्ही महिन्याला हे व्याज पकडले तर ते नऊ हजार दोनशे पन्नास रुपये होते व तुम्ही प्रत्येक महिन्याला देखील हे 9250 रुपये व्याजाचे काढू शकतात. म्हणजेच एकदा पंधरा लाख रुपये तर तुम्ही या योजनेत गुंतवले तर तुम्ही महिन्याला नऊ हजार 250 रुपये व्याजापोटी कमवू शकतात.

सिंगला खातेधारकांना किती रक्कम गुंतवता येते?
सिंगल अकाउंट असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये जमा करता येतात व वार्षिक व्याजदर 7.4 टक्के दराने पकडले तर वार्षिक व्याज नऊ लाखावर 66 हजार 600 रुपये इतके मिळते. तुम्हाला जर महिन्याला व्याज मिळवायचे असेल तर तुम्हाला ते पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रत्येक महिन्याला मिळत राहते.

योजनेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच योजना बंद केली तर काय होते?

1- यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असे आहे की तुम्ही रक्कम जमा केल्याच्या तारखेपासून पुढील एक वर्ष संपेपर्यंत या खात्यातून तुम्हाला पैसे काढता येत नाही.
2- खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर आणि तीन वर्षांपूर्वी योजना बंद केली तर मूळ रकमेच्या दोन टक्के रक्कम कमी केली जाईल आणि उरलेली रक्कम तुम्हाला परत दिली जाईल.
3- खाते उघडण्याच्या तारखेपासून तीन वर्षानंतर आणि पाच वर्षाच्या आधी जर खाते बंद केले तर मूळ रकमेच्या एक टक्के कमी केली जाईल व उर्वरित रक्कम परत दिली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe