IRCTC Package: 6 दिवस मस्तपैकी फिरायला जा थायलंडला! वाचा किती लागेल भाडे आणि कुठे कुठे फिरायला जाल?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IRCTC Package :- आपल्यापैकी बऱ्याच जणांना भारतात आणि भारताच्या बाहेर फिरण्याची खूप मोठी हौस असते. असे कायम पर्यटनाच्या दृष्टिकोनातून फिरणाऱ्या व्यक्तींकरिता अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून आकर्षक पॅकेज सादर केले जातात व या माध्यमातून अनेक सोयी सुविधा देखील पर्यटकांना पुरवल्या जातात. अगदी त्याच अनुषंगाने जर आपण इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीचा विचार केला तर यांच्या माध्यमातून देखील पर्यटकांसाठी अनेक आकर्षक टूर पॅकेज आणले जातात व या माध्यमातून देशात आणि परदेशात फिरण्याची चांगली संधी उपलब्ध करून देण्यात येते.

या माध्यमातून अनेक ठिकाणी भारतात रेल्वेच्या माध्यमातून देखील पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत व त्यासोबतच हवाई सफर करण्याची देखील संधी उपलब्ध करून दिली जाते. अगदी याच अनुषंगाने नुकतीच आयआरसीटीसीच्या माध्यमातून तुम्ही थायलंडचा प्रवास करू शकणार आहात. याकरिता आयआरसीटीसीने एक आकर्षक टूर पॅकेज आणले असून  या माध्यमातून तुम्ही सहा दिवस पाच रात्र असा थायलंडचा प्रवास करू शकणार आहात. या लेखामध्ये यासंबंधीची महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

 आयआरसीटीसीच्या माध्यमातून करा थायलंडचा प्रवास

आयआरसीटीसीने स्पार्कलिंग थायलंड एक्स लखनऊ या नावाचे पॅकेज आणले असून या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला थायलंडमध्ये पाच रात्री आणि सहा दिवस मनसोक्त पर्यटन करता येणार आहे. विशेष म्हणजे या अंतर्गतच तुम्हाला बँकॉक आणि पटाया या दोन्ही महत्त्वपूर्ण ठिकाणांना देखील भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

 या टूर पॅकेजेचे तिकीट दर कसे आहेत?

या संपूर्ण पॅकेज करिता तुम्हाला प्रतिव्यक्ती 69 हजार आठशे रुपये खर्च करावे लागणार असून यामध्ये जर तुम्ही दोघेजण असाल तर प्रति व्यक्ती साठ हजार तीनशे रुपये इतका खर्च येणार आहे. समजा तुमच्या सोबत जर पाच ते अकरा वर्ष वयाची मुले असतील तर त्यांच्याकरिता 55 हजार दोनशे रुपये खर्च तुम्हाला येणार आहे.

 कसा असणार आहे थायलंडचा प्रवास?

आठ डिसेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये थायलंडला भेट देण्यासाठी हवाई टूर पॅकेज आणले गेले आहे. याची सुरुवात ही उत्तर प्रदेश मधील लखनऊ या ठिकाणाहून सुरू होईल व लखनऊ ते बँकॉक आणि बँकॉक ते लखनऊ अशी थेट फ्लाईट यासाठी असणार आहे.

त्यामुळे तुम्हाला अगदी आरामदायी प्रवासाची अनुभूती मिळणार आहे.तसेच यामध्ये तुमचं राहणं, खाणे इत्यादी महत्त्वाच्या सुविधा देखील मिळणार आहेत. जर तुम्हाला देखील या संधीचे सोने करायचे असेल व थायलंड फिरायला जायचे असेल तर तुम्ही आयआरसीटीसीच्या irctctourism.com या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिकीट बुक करता येणार आहे.