Isro Update :- भारताने चांद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. एवढेच नाही तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला. या यशामागे भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोचा खूप मोठा वाटा असून यामध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांची अनेक दिवसांचे कष्ट आणि मेहनत आहे.
आपल्याला माहित आहेच की इस्रोच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अवकाश मोहिमा आतापर्यंत राबवण्यात आलेला आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे सूर्याशी संबंधित असलेली आदित्य एल 1 एक महत्त्वाकांक्षी मोहीम असून आजच आदित्य एल वन या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे एक महत्त्वाचे सोलर मिशन आहे.
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली काही महत्त्वाची माहिती
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आज भारताचे महत्त्वाचे सोलर मिशन असलेले आदित्य एल वनचे अकरा वाजून पन्नास मिनिटांनी आंध्रप्रदेश मध्ये श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले. हे प्रक्षेपण पीएसएलव्ही मधून करण्यात येणार होते व त्यामुळे अनेकांचे धाकधूक झालेली होती.
जर आपण इस्रोच्या अधिकाऱ्यांचा विचार केला तर रॉकेट प्रक्षेपण करण्यापूर्वी गेल्या पंधरा वर्षापासून हे अधिकारी तिरुपती येथील चेंगलम्मा परमेश्वरी मंदिरामध्ये प्रार्थना करतात व यावेळी आदित्य एन वन मोहिमेच्या यशस्वी होण्याकरिता इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ या मंदिरात प्रार्थनेसाठी आले होते व त्यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना काही महत्त्वाची माहिती दिली. यामध्ये त्यांनी येणाऱ्या काळामध्ये इस्रोच्या काय योजना आहेत याबाबतीत खुलासा केला.
यामध्ये माध्यम प्रतिनिधींनी इस्रोच्या प्रमुखांना चांद्रयान 4 या मोहिमेबद्दल विचारले असता त्यांनी यावेळी थेट उत्तर देण्याचे टाळले. त्यांनी फक्त म्हटले की अजून तरी यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही परंतु लवकरात लवकर याची घोषणा केली जाईल असे देखील त्यांनी म्हटले. महत्त्वाचे म्हणजे सन ऑब्झर्वेटरी मिशन नंतर इस्रो येणाऱ्या काळामध्ये KV-D3 आणि पीएसएलव्ही सह इतर अनेक उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याचे महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.
आदित्य एल 1 आज यशस्वी प्रक्षेपण
चांद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंग नंतर इस्रो ने आज सूर्याचा अभ्यास करता यावा याकरिता पहिली मोहीम पाठवली. मोहिमेचे नाव आदित्य एल वन असून ही मोहीम पीएसएलव्ही- सी 57 च्या एक्सएल आवृत्ती रॉकेटचा वापर करून श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात आले व हे पीएसएलव्ही चार टप्प्यातील रॉकेट आहे.
या रॉकेटने 63 मिनिटे 19 सेकंदा नंतर आदित्यला 235× १९५०० किमीच्या कक्षात सोडले व सुमारे चार महिन्यानंतर ते लिग्रंज पॉईंट एक वर पोहोचणार आहे. या पॉईंटवर ग्रहणाचा कोणताही प्रभाव दिसत नाही त्यामुळे या ठिकाणाहून सूर्यावर सहजपणे संशोधन करता येणे शक्य होणार आहे. हे 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे व थरस्टर पाच वेळा फायर करून कक्षा वाढवणार आहे. त्यामध्ये 110 दिवसांचा आदित्य प्रवास करेल व त्यानंतर ऑब्झर्व्हेटरी या ठिकाणाजवळ ते पोहोचणार आहे.