Jamin Nakasha Online : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातील असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, शेतकऱ्यांना विविध कामांसाठी शेत जमिनीचा नकाशा लागत असतो.
मात्र शेत जमिनीचा नकाशा काढताना आतापर्यंत शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत. त्यामुळे त्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात. किरकोळ कामासाठी त्यांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत. यामध्ये पैसा देखील खर्च होत असे. मात्र आता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना सातबारा आणि आठ अ उतारे ऑनलाइन मिळत होते. मात्र आता या उताऱ्यासोबतच जमिनीचा नकाशा देखील ऑनलाईन मिळू लागला आहे. निश्चितच शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे.
परंतु अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा ऑनलाईन नकाशा कशा पद्धतीने काढला जाऊ शकतो या संदर्भात फारशी माहिती नसल्याचे पहावयास मिळाले आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने बघितला जाऊ शकतो या संदर्भात बहुमूल्य अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत.
हे पण वाचा :- पंजाब डख यांचा हवामान अंदाज : राज्यात आजपासून पावसाला सुरवात होणार; किती दिवस पाऊस राहणार? वाचा…
जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा
सर्वप्रथम आपण गावाचा नकाशा कशा पद्धतीने पाहता येतो याविषयी जाणून घेणार आहोत. यासाठी आपणास mahabhunakasha.mahabhumi.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.
या वेबसाईटवर गेल्यानंतर पहिल्या पेजवर तुम्हाला डाव्या बाजूला लोकेशन हा पर्याय दिसेल. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र म्हणजेच आपला राज्य सिलेक्ट करायचे आहे यानंतर त्याखाली असलेल्या रुरल किंवा अर्बन म्हणजेच ग्रामीण किंवा शहरी यापैकी एक पर्याय सिलेक्ट करायचा आहे.
यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे. मग तुम्हाला विलेज मॅप या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर मग तुमच्या गावाचा संपूर्ण नकाशा तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
हे पण वाचा :- घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सिडको ‘या’ भागात काढणार 5000 घरांसाठीची लॉटरी, वाचा….
या पद्धतीने काढा जमिनीचा नकाशा
यानंतर तुम्हाला पहिल्या पेजवर वापस यायचे आहे. या नकाशाच्या पेजवर तुम्हाला सर्च बाय प्लॉट नंबर या पर्यायायात तुमच्या जमिनीचा गट क्रमांक टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर तुमचा गट नकाशा स्क्रीनवर ओपन होईल. येथे डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची माहिती दिलेली असते.
यानंतर डाव्या बाजूला खाली असलेल्या मॅप रिपोर्ट या पर्यावर क्लिक करा मग तुम्हाला तुमच्या जागेचा जमिनीचा प्लॉट रिपोर्ट पाहता येतो. यानंतर मग उजवीकडे डाऊनलोडचा बाण असेल त्यावर क्लिक करा आणि तुमचा जमिनीचा नकाशा तुम्ही डाऊनलोड करू शकता.
हे पण वाचा :- कापूस लागवड केलाय किंवा लागवडीच्या तयारीत असाल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला वाचाच !