Kia Carnival Car:- येणारा कालावधी हा भारतामध्ये सणासुदींचा कालावधी असून आता नवरात्री आणि दिवाळी सारखे सण अगदी तोंडावर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय वाहन बाजारपेठेमध्ये देखील आता नवनवीन कार लॉन्च केल्या जात आहेत. कारण या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करण्याचा ट्रेंड असतो व या निमित्ताने अनेक भारतीय आणि विदेशी कंपन्यांनी देखील नवनवीन कार सादर करून ऑटोमोबाईल क्षेत्रावर आपला दबदबा कायम राहावा यासाठी प्रयत्न चालवल्याचे दिसून येत आहे.
अगदी याचप्रमाणे जर आपण बघितले तर विदेशी कंपनी असलेल्या किया मोटर्सने देखील यामध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे व ही कंपनी तीन ऑक्टोबरला आपली नवीन Carnival कार लॉन्च करणार आहे व तशी तयारी देखील कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. ही एमपीव्ही सेगमेंट मधील कार असून या कारची बुकिंग देखील सुरू करण्यात आलेले आहे.

काय आहेत Kia Carnival कारमध्ये असलेले फीचर्स?
ही कार अजून सादर व्हायची बाकी असून त्या अगोदरच कंपनीच्या माध्यमातून अधिकृत संकेतस्थळावर या कारच्या फीचर्स बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. या माहितीनुसार बघितले तर या आरामदायी अशा एमपीव्ही मध्ये आकर्षक व उत्तम असे फीचर्स देण्यात आलेली आहेत. यामध्ये डुएल सनरूफ, 12.3 इंच वक्र डिस्प्ले,
360 डिग्री कॅमेरा तसेच स्मार्ट पावर स्लाइडिंग डोअर, मागील एलईडी कॉम्बिनेशन लॅम्प, फ्रंट एलईडी फॉग लॅम्प, बारा स्पीकर सह बोस प्रीमियम साऊंड सिस्टम, वायरलेस फोन चार्जर तसेच हेड फीचर्स यांचा समावेश करण्यात आलेला असून त्यासोबतच 18 इंचाचे अलॉय व्हिल्स, तीन झोन फुली ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल,
हेड अप डिस्प्ले आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तब्बल आठ एअरबॅग यामध्ये देण्यात आलेले आहेत. जर आपण कलर ऑप्शन बघितले तर ही कार दोन किंवा तीन अशा रंगांमध्ये सादर केली जाऊ शकते व यापैकी पांढरा आणि काळा हे दोन रंग प्रामुख्याने अपेक्षित आहेत.
किती असू शकते या कारची किंमत?
भारतात ही कार 3 ऑक्टोबरला लॉन्च होणार असून या कारची बुकिंग सुरू करण्यात आलेली आहे. भारतात सादर केल्या जाणाऱ्या kia Carnival कारची किंमत साधारणपणे 45 ते 50 लाख रुपयापासून सुरू होण्याची एक अपेक्षा आहे. भारतीय कार बाजारपेठेमध्ये इनोवा हायक्रॉस सारख्या कारसोबत या कारची स्पर्धा दिसू देणार आहे.