Knowledge Information: 2:30 ला अडीच आणि 1:30 ला दीड असे का म्हटले जाते? माहित आहे का तुम्हाला या मागील कारण?

Ajay Patil
Published:
clock information

Knowledge Information:- आपण बोलताना जेव्हा बऱ्याच गोष्टी बोलत असतो आणि काही शब्दांचा वापर करतो व अशाप्रसंगी काही शब्द हे अगदी वेगळ्या पद्धतीने उच्चारले जातात किंवा लिहिताना देखील ते वेगळ्या पद्धतीने लिहिले जातात. तसेच काही शब्दांच्या अर्थाच्या बाबतीत देखील शब्द उच्चारायला एकसारखे दिसतात परंतु त्यांचे अर्थ मात्र वेगवेगळे होतात. हे बहुतांश आपल्याला माहिती आहे.

अगदी याच पद्धतीने जर आपण कोणाला वेळ सांगितली तर बहुतांशी 8:30 वाजले असतील तर आपण म्हणतो साडेआठ वाजले,4:30 वाजले असतील तर आपण सांगतो की साडेचार वाजले. परंतु आपल्याला माहित आहे की जेव्हा 1:30 वाजलेले असतात

तेव्हा आपण इतर वेळेप्रमाणे साडे एक न सांगता दीड असे सांगतो व त्याचप्रमाणे 2:30 वाजलेले असताना आपण साडेदोन असे न सांगता अडीच वाजले असे सांगतो. तेव्हा आपल्या मनामध्ये कधीतरी हा प्रश्न आला असेल की 1:30 ला दीड आणि 2:30 ला अडीच असे का म्हटले जाते? तर याच प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात बघणार आहोत.

 काय आहे या मागील कारण?

जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये जी काही मोजणीची पद्धत अस्तित्वात आहे त्यामध्ये दीड आणि अडीच हे जे काही शब्द आहेत ते अपूर्णांकात एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीचे वर्णन करत असतात. हे पार पूर्वापार भारतामध्ये चालत आलेले असून ही एक अपूर्णांक संख्या आहे.

आपल्याला माहित असेलच की अपूर्णांक ही अशी संख्या असते जी पूर्ण संख्येचा भाग दाखवत असते. म्हणजेच उदाहरण घेतले तर तीन या संख्येला जर दोन या संख्येने भागले तर त्याला आपण दीड असे म्हणू शकतो किंवा पाच या संख्येला दोन या संख्येने भागले असेल तर त्याला अडीच म्हटले जाते.

आपल्याला माहित आहे की गणिताच्या दृष्टिकोनातून भारताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे व अपूर्णांकासारख्या ज्या काही संख्या आहेत ही भारताची जगाला मिळालेली देणगी आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये आज देखील अपूर्णांक संख्यांचा वापर केला जातो. तसेच वजन व वेळ देखील अपूर्णांकामध्ये मोजली जाते.

यापैकी दीड आणि अडीच हे जे शब्द आहेत ते अगदी सुरुवातीपासूनच भारताचे गणिताचे मूलभूत शब्द आहेत. अगदी त्याच पद्धतीने पाऊण आणि सव्वा देखील शब्द तितकेच भारतात प्रचलित आहेत. घड्याळाची वेळ सांगताना आपण या शब्दांचा बऱ्याचदा उल्लेख करतो.

8:15 वाजले असतील तर आपण सव्वा आठ वाजले असे म्हणतो. कारण ते उच्चारणाच्या दृष्टिकोनातून देखील सोपे आहे. म्हणजेच यावरून आपल्याला कळते की यामध्ये काही जास्त मोठे तंत्रज्ञान किंवा सायन्स नसून ती भारतीय प्रमाण आणि व्यवहारांमध्ये एक महत्त्वाची बाब आहे व त्या पद्धतीनेच त्याचा वापर केला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe