मोठी बातमी! नववर्षात पूर्ण होणार ‘हे’ महत्वाकांक्षी महामार्ग ; महाराष्ट्रासह देशाचा चेहरामोहरा बदलणार

Maharashtra Breaking : कोणत्याही राष्ट्राच्या विकासात त्या राष्ट्राची दळणवळण व्यवस्था पायाभूत विकास सुविधा महत्त्वाची आणि अतिशय मोलाची भूमिका बजावत असतात. आपला भारत देश विश्वगुरू बनू पाहत आहे, साहजिकच यामुळे देशाची पायाभूत विकास सुविधा मजबूत बनवण्याचे काम सुरू आहे.

यामध्ये प्रामुख्याने रेल्वे मार्ग आणि महामार्ग बिल्डिंगचे काम केले जात आहे. दळणवळण व्यवस्था मजबूत झाल्यास देशाचा विकास मजबुतीने होईल. दरम्यान, 2022 मध्ये अनेक मोठे प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तसं काही झालं नाही. अनेक मोठे प्रकल्प अजूनही रखडलेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अगदी कासव गतीने त्यांचे कामे सुरू आहेत. मात्र यंदाच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये हे प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होतील अशी आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे आज आपण महाराष्ट्रासह संपूर्ण देशात असे कोणते प्रकल्प आहेत जे 2023 मध्ये सुरू होणार आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

मुंबई-दिल्ली महामार्ग :- देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणारा मार्ग म्हणजेच मुंबई दिल्ली महामार्ग होय. महाराष्ट्रासह देशातील एकूण सहा राज्यांसाठी अति महत्त्वाचा आणि देशाच्या एकात्मिक विकासासाठी मैलाचा दगड ठरू पाहणारा हा महामार्ग 2019 मध्ये सुरू झाला आणि 2021 मध्ये पूर्ण होईल अशी आशा होती. मात्र तसं काही झालं नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या महामार्गाचा दिल्ली ते दौसा हा पहिला टप्पा जानेवारीअखेर सुरू होणार आहे. मात्र संपूर्ण महामार्ग सुरू होण्यासाठी जवळपास 2025 उलटून जाणार आहे. या महामार्गाची लांबी 1350 किलोमीटर एवढी असून यामुळे दिल्ली ते मुंबई प्रवास 12 तासात करता येणार आहे.

सध्यास्थितीला दिल्ली ते मुंबई दरम्यान प्रवास करताना 24 घंटे लागतात. या महामार्गासाठी एक लाख तीन हजार कोटी रुपयांचा खर्च लागला आहे. या महामार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक स्पेशल लेन राहणार आहे, तसेच या रस्त्यावर विमान लँडिंगसाठी सुविधा राहणार आहे, शिवाय सध्या स्थितीला हा महामार्ग आठ लेनचा राहणार असून याला बारा लेन पर्यंत एक्सपांड करता येणार आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक :- या प्रकल्पाच्या माध्यमातून नवी मुंबईतील न्हावा आणि मुंबईतील शिवडी दरम्यान पूल बांधला जाणार आहे. न्हावाशेवा येथील बंदरातून देशभरात मालवाहतूक होत असते. साहजिक या पुलाचा या मालवाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. खरं पाहता हा प्रोजेक्ट 2018 साली सुरू झाला आहे. मात्र अजूनही या प्रोजेक्टवर काम सुरूच आहे. यासाठी 14000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निश्चितच या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या वैभवात भर पडणार आहे.

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग :- राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणारा दुवा अर्थातच मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. या महामार्गाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून भारत वर्षात ओळखले जाऊ लागले आहे. खरं पाहत, या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

हा पहिला टप्पा जो की पाचशे वीस किलोमीटर लांबीचा आहे तो 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या करकमलाद्वारे सुरू करण्यात आला आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून राज्यातील दहा जिल्ह्यात जाणार आहे. या महामार्गासाठी 55 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण महामार्ग यंदा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.