मोठी बातमी ! शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपावर ‘हा’ तोडगा निघाला? राज्य परीक्षा महामंडळाने दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Employee Strike : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडून आपल्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी संपाची भूमिका घेण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला आहे. तसेच राज्यातील अकृषी उच्च माध्यमिक विभागातील विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारला आहे.

या संपाबाबत आता महाराष्ट्र राज्य परीक्षा महामंडळाने मोठी माहिती दिली आहे. राज्य परीक्षा महामंडळाने केलेल्या दाव्यानुसार, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे इयत्ता बारावीच्या परीक्षा प्रभावित होणार नाहीत. बारावीच्या लेखी परीक्षा ह्या नियोजित वेळेतच होणार आहेत.

तसेच बारावीच्या तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा ज्या संपामुळे प्रभावित होतील त्या पुढील महिन्यात पुन्हा आयोजित केला जाऊ शकतात. दरम्यान बारावीच्या लेखी परीक्षेसाठी उपलब्ध असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बळावर नियोजन हे केल जाणार आहे. एकंदरीत या संपामुळे परीक्षा प्रभावित होणार नाहीत याची खातरजमा परीक्षा महामंडळाकडून केली जात आहे.

दरम्यान राज्य परीक्षा महामंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी लवकरच बैठकीचे आयोजन होईल आणि या बैठकीत सविस्तर अशी चर्चा करू. तसेच चर्चांअंती या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढू असं गोसावी यांनी नमूद केलं. यासोबतच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात या अनुषंगाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे.

शासनाकडून आपले प्रलंबित प्रश्न सोडवली जात नसल्याचा आरोप करत या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी हा बहिष्कार घातला आहे. यावर बोलताना गोसावी यांनी लवकरच शासन स्तरावर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत चर्चा होणार असून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सांगितलं गेलं आहे.

एकंदरीत राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपावर लवकरच तोडगा काढला जाणार आहे. यामुळे आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या खरंच सोडवल्या जातात का आश्वासन देऊन यां प्रकरणाची तात्पुरती बोळवण केली जाते. हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.