धक्कादायक ! महाराष्ट्रातील ‘त्या’ शेतकऱ्यांचे रेशन झाले बंद; शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Farmer Ration News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात असतात. विविध कल्याणकारी योजना शासन सुरू करत असते. तर काही योजनांमध्ये बदल करून शासनाकडून सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असतो.

अशातच फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला. यानुसार राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील प्राधान्य गटातील शेतकऱ्यांना धान्य ऐवजी पैसे देण्याचा निर्णय झाला.

जरी याचा जीआर अर्थातच शासन निर्णय फेब्रुवारी महिन्यात निर्गमित झाला असला तरी देखील याचा लाभ जानेवारी 2023 पासून संबंधित आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील प्राधान्य गटातील शेतकऱ्यांना दिला जाईल असं शासनाने जाहीर केलं.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो तयारीला लागा ! आजपासून ‘इतके’ दिवस महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात बरसणार पावसाच्या धारा, तुमच्याकडे पाऊस आहे की नाही? वाचा….

मात्र अद्यापही याचा लाभ या संबंधित जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील 82 हजार शेतकऱ्यांचे रेशन बंद करण्यात आले आहे मात्र या शेतकऱ्यांना अजून रोख रक्कमेचा लाभ मिळालेला नाही. यामुळे हे शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील केवळ 27 शेतकऱ्यांना रोख रकमेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना मात्र लाभ मिळालेला नसून त्यांचे धान्यही बंद झाले आहे आणि रोख रक्कम देखील शासनाकडून मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

हे पण वाचा :- सोयाबीनच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आणि त्यांच्या विशेषता, पहा…

काय आहे शासन निर्णय

फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वासिम, बुलढाणा, वर्धा या चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील प्राधान्य गटातील शेतकऱ्यांचे रेशन कार्ड लाभार्थ्यांचे रेशन बंद करून त्यांना प्रति लाभार्थी 150 रुपये प्रति महिना एवढी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील 82 हजार शेतकऱ्यांचे स्वस्त धान्य बंद करण्यात आले आणि या शेतकऱ्यांना 150 रुपये प्रति लाभार्थी प्रति महिना याप्रमाणे पैसे देण्याचा निर्णय झाला आहे.

मात्र या शेतकऱ्यांना अद्याप याचा लाभ मिळालेला नाही. म्हणजे या शेतकऱ्यांना आता स्वस्त धान्यही मिळत नाहीये आणि पैसेही मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रोख रक्कम शासनाकडून मिळावी अशी आशा यावेळी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा :- 10वी, 12वीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार दहा हजार रुपये ! कोणते विद्यार्थी राहणार पात्र? वाचा….