Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

ब्रेकिंग ! आता महाराष्ट्रात NA टॅक्स लागणार नाही; महसूल मंत्री विखे पाटलांची मोठी घोषणा

Maharashtra Free NA Tax News : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्रात NA म्हणजेच अकृषी टॅक्स आकारला जाणार नाही.

Maharashtra Free NA Tax News : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्रात NA म्हणजेच अकृषी टॅक्स आकारला जाणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिंदे फडणवीस शासन लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. अर्थातच आता NA जमिनी खरेदी करतांना एकदाच वन टाइम टॅक्स भरावा लागणार आहे त्यानंतर टॅक्स भरण्याची काही गरज राहणार नाही.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा

साहजिकच या निर्णयाचा राज्यातील बहुतांशी जनतेला फायदा होणार आहे. यामुळे शासनाने हा निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे असे देखील मत काही लोकांकडून व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे दरवर्षी NA करण्याची गरज राहणार नसल्याने एक क्लेशदायक प्रक्रियातुन सामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे.

साहजिकच शासनाच्या या निर्णयामुळे सामान्य जनतेचा फायदा होत असला तरी देखील राज्य शासनाच्या तिजोरी मधील एक मोठा महसूल यामुळे कमी होणार आहे. 

हे पण वाचा :- मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! ‘या’ मेट्रोमार्ग प्रकल्पाबाबत झाला मोठा निर्णय; आता मुंबई ते ठाणे प्रवास लवकरच होणार सुसाट, पहा काय आहे निर्णय?

या नवीन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्य शासनाचा मोठा महसूल बुडणार असल्याची माहिती देखील पाटील यांनी दिली आहे. मात्र हा निर्णय सामान्य जनतेच्या हिताचा असल्याने शिंदे फडणवीस सरकार हा निर्णय घेण्यासाठी उत्सुक असल्याचे यानिमित्ताने पहावयास मिळाले आहे.

तसेच मंत्री महोदय यांनी भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीचे जे नकाशे दिले जातात ते आता 15 दिवसांत घरपोच देण्यात येतील अशी माहिती देखील दिली आहे. निश्चितच NA म्हणजे अकृषी टॅक्स बाबत शासनाने घेतलेला हा निर्णय सामान्य जनतेच्या हिताचा असून या निर्णयाचे सामान्य जनतेच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.

हे पण वाचा :- खुशखबर ! मुंबईहुन सुटणाऱ्या ‘या’ सुपरफास्ट ट्रेनला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड रेल्वे स्टेशनवर थांबा मिळणार; पहा…