Maharashtra Government Employee : ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना आता वेळेत पगार मिळणार ; अतिरिक्त निधी उपलब्ध?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Government Employee : नुकत्याच काही दिवसापूर्वी शालार्थ प्रणाली बंद पडली म्हणून शिक्षकांना डिसेंबर महिन्यातील वेतन जे की जानेवारीत मिळणार आहे उशीर होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र तदनंतर संबंधित प्राधिकरणाने वेळीच शालार्थ प्रणाली पूर्ववत केली आणि आता शिक्षकांना वेळेत पेमेंट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अशातच आता शिक्षकांच्या वेतना संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. शिक्षकांना वेळेवर पगार मिळावा यासाठी ऑनलाईन पद्धतीने पगार देण्याचे नियोजन शासनाकडून आखले जात आहे.

म्हणजेच शिक्षकांना पगार थेट बँक खात्यात मिळणार आहे, यासाठी पद्धती विकसित केली जात आहे. एवढेच नाही तर शिक्षकांचा पगार वेळेवर होण्यासाठी अतिरिक्त निधी देखील उपलब्ध केला जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत विधान परिषदेत मंत्री दीपक केसरकर बोलत होते. खरं पाहता राज्यातील शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, प्रलंबित वैद्यकीय बिले तसेच सातवा वेतन आयोगाचे हप्ते याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला असता याच्या उत्तरात दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे.

याशिवाय शिक्षणमंत्री केसरकर यांनी सांगितले की, शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा हप्ता देऊ करण्यात आला आहे. म्हणजेच शिक्षकांना तिसरा हप्ता मिळालेला नाही. दरम्यान आता तिसरा हप्ता देण्यासाठी निधीची तरतूद केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले आहे.

शिवाय सर्व जिल्हा परिषदांना वेतनांचा निधी वेतनावर खर्च करण्याच्या सूचना देण्यात येतील. एवढेच नाही तर वैद्यकीय देयकासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असं देखील यावेळी दीपक केसरकर यांनी नमूद केल आहे.