ब्रेकिंग ! ‘या’ विद्यार्थ्यांचे बारावीचे निकाल राहणार राखीव, काही विद्यार्थ्यांचे निकाल रद्द पण होऊ शकतात; कारण काय?
Maharashtra Hsc Result : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल आता येत्या काही दिवसात जाहीर होणार आहेत.
परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे लक्ष लागून असते ते निकालाकडे. मात्र अद्याप दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात बोर्डाकडून कोणतीच अधिकारीक माहिती देण्यात आलेली नाही.
पण येत्या काही दिवसात दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दहावी आणि बारावीचे निकाल यंदा वेळेतच लागतील असा दावा देखील करण्यात आला आहे. अशातच मात्र बारावीच्या निकालासंदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, बारावीच्या काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे समकक्षता प्रमाणपत्र मंडळाला मिळालेले नाही, अशा विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवणार असल्याची माहिती नाशिक विभागीय मंडळामार्फत नुकतीच देण्यात आली आहे.
नासिक विभागातील अशा 14 विद्यार्थ्यांची नावे आतापर्यंत जाहीर झाली असून या विद्यार्थी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता देखील आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, परराज्यांतून राज्य मंडळाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर अन्य मंडळातून दहावीची परीक्षा दिल्यानंतर राज्य मंडळांतर्गत अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे समकक्षता प्रमाणपत्र सादर करावे लागते.
वास्तविक हे प्रमाणपत्र अकरावीच्या प्रवेशादरम्यानच सादर करावे लागते. मात्र आता अकरावीचे संपूर्ण वर्ष होऊन गेले तसेच बारावीच्या बोर्डाचा पेपर देखील होऊन गेला. परंतु या विद्यार्थ्यांनी अजूनही समकक्षता प्रमाणपत्र सादर केलेले नाही.
अशा परिस्थितीत आता या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच आता ज्या विद्यार्थ्यांना समकक्षता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर हे प्रमाणपत्र आपल्या महाविद्यालयात सादर करावे लागेल अन्यथा त्यांचा निकाल राखीवच राहू शकतो.
असं झालं तर निकाल होईल रद्द
वास्तविक समकक्ष प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांनी हे प्रमाणपत्र सादर नाही केलं तर त्यांना बारावीची परीक्षा देता येत नाही. परंतु अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा देण्याची मुभा दिली जाते.
विशेष म्हणजे या अशा विद्यार्थ्यांना निकाल लागल्यानंतर एका विहित कालावधीमध्ये आपले हे समकक्ष प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा दिली जाते. परंतु विहित कालावधीमध्ये हे प्रमाणपत्र सादर केले नाही तर संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल रद्द होऊ शकतो. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना आता लवकरात लवकर आपले समकक्ष प्रमाणपत्र विद्यालयात सादर करायचे आहे.