Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धुळे अन ‘या’ जिल्ह्यात पुढील 4 ते 5 तासात कोसळणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाचा इशारा

Maharashtra IMD Rain Alert : राज्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. अवकाळी पावसाने अक्षरशः त्राहीमाम माजवला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Maharashtra IMD Rain Alert : राज्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. अवकाळी पावसाने अक्षरशः त्राहीमाम माजवला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील नासिक, परभणी, भंडारा, पुणे या जिल्ह्यात गेल्या काही तासात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद आहे. विशेषता पुणे जिल्ह्यातील काही भागात गेल्या काही तासात गारपीट झाली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा :- शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झाली चांदी ! ‘या’ स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मिळालेत 1 कोटी 60 लाख, पहा….

नाशिक जिल्ह्यातही गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आता भारतीय हवामान विभागाकडून एक गंभीर इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तासात राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा वाहणार आणि जोरदार पाऊस पडेल असा इशारा आहे. आता आपण हवामान विभागाने नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पुढील तीन ते चार तासात पावसाची शक्यता वर्तवली आहे याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- मुंबई उच्च न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल 52 हजार 400 रुपये महिना, पहा सविस्तर

या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस !

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार तासात अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजी महाराज नगर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस यावेळी पडणार आहे. यामुळे नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान नासिक जिल्ह्यात जरी भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलेला नसला तरी देखील जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना सुरू आहे.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पुन्हा ‘अस’ केल तर सरळ सेवेतून मुक्त करणार, होणार सक्तीची सेवानिवृत्ती, पहा शासनाचा नवीन निर्णय

काही ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवश्यकता आहे. निश्चितच, वादळी वाऱ्यासहं कोसळणारा हा पाऊस शेती पिकांसाठी घातक असून वीज पडण्याच्या घटना देखील गेल्या काही दिवसांत घडल्या असल्याने शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहावे लागणार आहे. पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर लगेचच सुरक्षित ठिकाणी शेतकऱ्यांना आश्रय घेण्याचे आवाहन केले जात आहे. 

हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! BSF मध्ये निघाली भरती; घरबसल्या इथं करा अर्ज, पहा डिटेल्स