महाराष्ट्रात आहे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री ठिकाण! नाही जाऊ शकत तुम्ही तुमच्या कारने, कारण की….

कारने किंवा एखाद्या वाहनाने त्या ठिकाणी जाणे याबाबत मनाई आहे. अशा प्रकारची मनाई भारतातच नव्हे तर जगातील इतर काही ठिकाणाच्या शहरांमध्ये देखील आहे. यामागे देखील काही महत्त्वाची कारणे आहेत व त्यामुळेच तुम्हाला कारने अशा ठिकाणी जाता येत नाही.

Ajay Patil
Published:

प्रामुख्याने आता बऱ्याच व्यक्तींकडे स्वतःच्या कार असल्याने जर कुठेही जायचे असेल तरी आपण आपली कार काढतो आणि कारने प्रवास करत त्या ठिकाणी पोहोचत असतो. अशाप्रकारे कारने प्रवास करताना तो प्रवास वेळेत तर होतोच परंतु आपण वेळेमध्ये ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करू शकतो.

परंतु जर आपण महाराष्ट्रातील एका ठिकाणाचा विचार केला तर या ठिकाणी तुमच्याकडे कार असून देखील काही फायदा होत नाही. या ठिकाणी जर तुम्ही गेलात तरी तुम्हाला तुमची कार नेता येऊ शकत नाही.

या ठिकाणी कारने किंवा एखाद्या वाहनाने त्या ठिकाणी जाणे याबाबत मनाई आहे. अशा प्रकारची मनाई भारतातच नव्हे तर जगातील इतर काही ठिकाणाच्या शहरांमध्ये देखील आहे. यामागे देखील काही महत्त्वाची कारणे आहेत व त्यामुळेच तुम्हाला कारने अशा ठिकाणी जाता येत नाही.

 माथेरान हिल स्टेशन आहे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन

आता माथेरान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये आहे. माथेरानला भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून देखील ओळखले जाते. या व्यतिरिक्त या माथेरानचे जर एक वैशिष्ट्य पाहिले तर हे आशियातील एकमेव असे ऑटोमोबाईल फ्री स्टेशन असून या ठिकाणी तुम्हाला जायचे तर तुम्ही कार किंवा ऑटोचा वापर करू शकत नाहीत.

कारण सरकारच्या माध्यमातून हे क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले असून त्यामुळे या ठिकाणी प्रवास करण्यासाठी बरेच लोक घोडेस्वारीचा वापर करतात. या ठिकाणी तुम्हाला मोठा आवाज देखील करता येऊ शकत नाही आणि हॉर्न वाजवण्यावर पूर्णपणे बंदी आहे.

 माथेरान आहे निसर्गाचा समृद्ध ठेवा

हे हिल स्टेशन साधारणपणे समुद्रसपाटीपासून 2600 फूट उंच असून मुंबई शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जर तुम्ही कार घेऊन गेला तर तुम्हाला काही अंतरावर खाली उतरून  त्यानंतर घोड्यांवरून तुम्हालाही या हिल स्टेशनला जाता येऊ शकते. तसेच लुईसा पॉईंट येथे ट्रेकिंग करताना तुम्ही दीड किलोमीटरचा मार्ग सहजपणे कव्हर करू शकतात.

या ठिकाणी असलेले शार्लोट लेक हे सर्वात प्रेक्षणीय स्थळांपैकी एक असून निसर्गाच्या सानिध्यामध्ये शांत वेळ घालवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठिकाण आहे. तसेच माथेरानला फिरण्यासाठी तुम्ही टॉय ट्रेनचा देखील वापर करू शकता.

 जगातील या ठिकाणी देखील आहे कार बंदी

भारतातील माथेरान व्यतिरिक्त इटलीतील व्हेनिस हे असे एकमेव शहर आहे ज्या ठिकाणी कार चालवण्याची परवानगी नाही. तसेच गिथॉर्न मध्ये देखील कार चालवण्यास परवानगी नसून हे डच प्रांत ओहरीज सेलमध्ये वसलेले एक लहान ठिकाण आहे.या ठिकाणी तुम्हाला कुठेही प्रवास करायचा राहिला तरी हॉर्न न वाजवता बोटीचा वापर करावा लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe