मोठी बातमी ! महाराष्ट्रात 5,267 किलोमीटरचे नवीन महामार्ग बांधले जाणार, राज्य सरकारने आखलाय मेगा प्लॅन

Maharashtra News : महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी आणि दळणवळण अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने एक मेगा प्लॅन तयार केला आहे. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राच्या विकासात त्या राष्ट्रांमधील इन्फ्रास्ट्रक्चर किंवा दळणवळण सेवा महत्त्वाची भूमिका बजावत असते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील विकासाला गती देण्यासाठी राज्यात तब्बल 5267 किलोमीटरचे नवीन द्रुतगती महामार्ग विकसित करण्याचा मेगा प्लॅन तयार केला आहे.

यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोघांकडून रस्त्यांचे बांधकाम योजिले गेले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ 4217 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणार आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 1050 km लांबीचे दुर्गती महामार्ग विकसित करणार असल्याचे सांगितले गेले आहे. राज्य शासनाच्या या मेगा प्लॅनला सुरुवात देखील झाली आहे. या 5267 किलोमीटर पैकी 94 किमीचा मुंबई पुणे महामार्ग या आधीच पूर्ण झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच मुंबई नागपूर महामार्ग अर्थात समृद्धी महामार्ग देखील अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार या समृद्धी महामार्गाचा विस्तार देखील केला जाणार आहे. यानुसार 180 किलोमीटरचा जालना नांदेड आणि 141 किलोमीटरचा नागपूर गोंदिया महामार्ग विकसित केला जाणार आहे. तसेच गोंदिया गडचिरोली हा 106 किलोमीटरचा आणि गडचिरोली नागपूर हा 156 किलोमीटरचा महामार्ग देखील समृद्धी महामार्गाला विस्तारण्याचे काम करणार आहे. याशिवाय मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यान कोकण दृतगती महामार्ग उभारला जाणार आहे जो की 318 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.

याशिवाय विरार अलिबाग हा 98 किलोमीटरचा महामार्ग देखील या प्रकल्प अंतर्गत उभारला जाणार आहे. पुण्यामध्ये देखील वाहतूक कोंडीचा निपटारा करण्यासाठी 168 किलोमीटरचा महामार्ग विकसित होणार आहे. याशिवाय नागपूर गोवा हा 760 किलोमीटरचा आणि पुणे नासिक औद्योगिक महामार्ग हा 180 किलोमीटरचा महामार्ग बांधणे देखील या प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित आहे. शिरूर-बीड-लातूर राज्य सीमा हा 300 किमीचा महामार्ग प्रस्तावित आहे.

तसेच नाशिक-धुळे-जळगाव-अमरावती-नागपूर हा 650 किमीचा महामार्ग तयार होणार आहे. औरंगाबाद-जळगाव हा 125 किमीचा महामार्ग देखील उभारला जाणार आहे. शेगाव-अकोला-नांदेड हा देखील 240 किलोमीटरचा महामार्ग तयार होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित महामार्ग उभारणीसाठी कंबर कसली आहे.

दरम्यान 1050 किलोमीटरचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तयार करणार आहेत. यामध्ये औरंगाबाद-पुणे महामार्ग (270 किमी, राज्यातील भाग), सुरत ते चेन्नई महामार्ग (450 किमी, राज्यातील भाग), दिल्ली-मुंबई महामार्ग (110 किमी, राज्यातील भाग), पुणे-बंगळूरु महामार्ग (220 किमी, राज्यातील भाग) या महामार्गाचा समावेश आहे.

निश्चितच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार असून यामुळे कृषी क्षेत्राला तसेच उद्योग जगताला मोठा फायदा होणार आहे. शिवाय यामुळे पर्यटन क्षेत्र देखील गतिमान होणार आहे.