पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ ‘या’ 50 गावात बांधली जाणार सभागृह ! अहमदनगरमधील ‘त्या’ गावांचाही आहे समावेश, गावांची यादी पहा…


पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे, महिला आणि बालविकास विभागाने प्रत्येक गावातील दोन महिलांचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्रातील 50 गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह उभारली जाणार आहेत. या निर्णयाचा फायदा राज्यातील 14 जिल्ह्यातील 50 गावांना होणार आहे.

यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. निश्चितच राज्य शासनाचा हा निर्णय या संबंधित गावातील गावकऱ्यांसाठी फायद्याचा राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ज्या 50 गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह विकसित केली जाणार आहेत त्या गावांची नावे आता निश्चित झाली आहेत.

वास्तविक, 18 जानेवारी 2023 ला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत या गावांमध्ये सामाजिक सभागृह उभारणीस मंजुरी देण्यात आली होती. यावेळी या सभागृहांसाठी संबंधित गावांमध्ये जागा उपलब्ध आहे का? उपलब्ध असल्यास ना हरकत प्रमाणपत्र, आणि इतर आवश्यक कागदपत्रे शासनाला उपलब्ध करून देण्यासाठी 24 मे 2023 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

हे पण वाचा :- मुंबई, नागपूर, पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ एक्सप्रेस ट्रेन रद्द, पहा यादी

एकीकडे ग्रामविकास विभागाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे, महिला आणि बालविकास विभागाने प्रत्येक गावातील दोन महिलांचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरस्कार 31 मे 2023 ला दिला जाणार आहे. आता आपण ग्रामविकास विभागाने कोणत्या गावात सामाजिक सभागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे त्या गावांची नावे जाणून घेणार आहोत.

अहमदनगर जिल्ह्यातील या गावात विकसित होणार सामाजिक सभागृह 

हाती आलेल्या माहितीनुसार, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील 14 जिल्ह्यांमधील 50 गावांमध्ये सामाजिक सभागृह विकसित होणार असून यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चार गावांमध्ये सामाजिक सभागृह विकसित होणार आहेत. निमगाव घाना, मोहरी, आस्तेगाव आणि मुकुंदपुर या अहमदनगर जिल्ह्यातील चार गावात सामाजिक सभागृह विकसित होणार आहेत.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! बारावीनंतर आता महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या निकालाची तारीख जाहीर ? ‘या’ दिवशी लागणार रिजल्ट, वाचा….

इतर 13 जिल्ह्यांच्या गावांची यादी

जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक 10 गावांमध्ये या निर्णयानुसार सामाजिक सभागृह तयार होणार आहेत. यात पहूरपेठ, वाकोद, लोहारा, पहूरकसबे, कुन्हाड, म्हसावद, चहार्डी, अहिरवाडी, शिरसाला, पाळधी या गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधली जाणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली, आदमापूर, वाशी या गावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह बांधण्याचा निर्णय झाला आहे.

जालना जिल्ह्यातील घाणेवाडी या गावात सामाजिक सभागृह विकसित होणार आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टेंभुर्णी, चिंचोली निपाणी, आनंदगाव या गावात सामाजिक सभागृह विकसित केली जाणार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर या गावात सामाजिक सभागृह विकसित होणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील नागरे, जाडकरवाडी या गावात सामाजिक सभागृह तयार होतील.

नांदेड जिल्ह्यातील माळेगाव, रीसनगाव, शेळगाव छत्री, वझरगा, नरसी या गावात सामाजिक सभागृह तयार केले जाणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील पोफळी, मंगलादेवी, चिखलगाव, धनगरवाडी, मारवाडी या गावात सामाजिक सभागृह विकसित होणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील भरणे या गावात सभागृह बांधल जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातील कांबळेश्वर, टाकेवाडी, वाठार स्टेशन या गावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सभागृहाची निर्मिती केली जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरंदल धनगरवाडी या गावात सामाजिक सभागृह उभारले जाईल.

चंद्रपूर जिल्ह्यातील खेडी, बेम्बाळ, थुतरा, तेमुर्डा, भंगाराम तळोधी, नवरगाव या गावांचा देखील यामध्ये समावेश राहणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील घोराड, रोहणा-इंदरवाडा. बेला, केळवद या गावात सामाजिक सभागृह विकसित होणार आहेत.

नंदूरबार जिल्ह्यातील म्हसावद या गावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह बांधण्याचे नियोजन आहे. 

हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट ! नवीन वंदे भारत मडगावकडे रवाना; केव्हा होणार उदघाट्न? पहा….