पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! लवकरच मिळणार पदोन्नती ; डिटेल्स वाचा

Maharashtra Police Promotion : राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार, पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस निरीक्षकपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र आता हा प्रश्न लवकरच निकाली काढला जाणार असल्याचे चित्र आहे. कारण की पोलीस महासंचालक लवकरच विभागीय पदोन्नती समितीची बैठक बोलावून पदोन्नतीचा मार्ग मोकळा करणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे राज्यातील पदोन्नतीसाठी वाट पाहत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. निश्चितच महासंचालकांनी याबाबत योग्य तो निर्णय घेतला तर पोलीस प्रशासनातील कनिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासाठी नववर्षाच्या पूर्वीच नववर्षाची भेट सुनिश्चित होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, २०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या पोलीस हवालदार यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती तसेच पोलीस उपनिरीक्षक ते सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी विभागीय पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक होत असते. जी की गरजेची असते आणि या बैठकीतच पदोन्नती बाबत निर्णय घेतला जातो.

मात्र ही बैठक गेल्या एका वर्षापासून घेतली गेलेली नाही. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस महासंचालक रजनीश शेठ हीवाळी अधिवेशनानिमित्त उपराजधानी नागपूर मध्ये आले होते. याठिकाणी त्यांना पोलीस कर्मचारी पदोन्नती संदर्भात विचारणा झाली.

यावेळी त्यांनी डीपीसी बाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली आणि लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी लवकरच ही बैठक आयोजित होईल आणि पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा यावेळी व्यक्त केली. आता पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांनाही पदोन्नती देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे.

तसेच २०१३ मध्ये विभागीय पात्रता परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना देखील पदोन्नती देण्यात येणार आहे. दरम्यान राज्यातील 520 पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे. आता पोलीस महासंचालकांनी डीपीसी बाबत सूचना दिल्या असल्याने लवकरच डीपीसीची बैठक आयोजित होईल आणि पदोन्नतीचा हा प्रश्न निकाली निघेल आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा नववर्षाच्या पूर्वसंध्यावर मिळेल हीच आशा आहे

. निश्चितच, महाराष्ट्र राज्य पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या आणि पदोन्नतीची वाट पाहत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही एक गुड न्यूज आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पोलीस पदोन्नतीबाबत होत असलेल्या चर्चा थांबणार आहेत एवढे नक्की.