महाराष्ट्रात रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 3190 जागांसाठी निघाली भरती, 10वी आणि 12वी पास उमेदवार राहणार पात्र, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज आम्ही एक मोठी आनंदाची बातमी घेऊन हजर झालो आहोत. विशेषता ज्यांना रेल्वेमध्ये नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे.

कारण की, रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था या विभागात विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत 3190 रिक्त पदांची भरती होणार आहे.

विशेष बाब म्हणजे या पदासाठी दहावी आणि बारावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता सिडको Navi Mumbai मध्ये निओ मेट्रो सुरु करणार, कसा राहणार रूट, पहा…..

कोणत्या पदासाठी होणार भरती?

कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या पदभारती प्रक्रिया अंतर्गत कनिष्ठ वेळ रक्षक – 1676 पदे, कनिष्ठ सहाय्यक – 908 पदे, कल्याण अधिकारी – 606 पदे भरली जाणार आहेत. अर्थातच एकूण 3 हजार 190 रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरण्याचे नियोजन आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार कनिष्ठ वेळ रक्षक या पदासाठी दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी किमान बारावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. कल्याण अधिकारी या पदासाठी पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मात्र एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचायची आहे.

हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वे स्टेशनवर विक्रेत्यांनी MRP पेक्षा अधिक किंमत आकारली तर ‘या’ ठिकाणी करा तक्रार, वाचा….

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय हे 18 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

किती वेतन मिळणार?

कनिष्ठ वेळ रक्षक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 28 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.

कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 35 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.

कल्याण अधिकारी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 40 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. https://rmgs.org/apply.php या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात.

हे पण वाचा :- म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनो सावधान ! ‘ही’ काळजी घ्या नाहीतर होणार लाखों रुपयांची फसवणूक

अर्ज करण्याची अंतिम दिनांक?

25 मे 2023 पर्यंत या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. उमेदवारांना मात्र विहित कालावधीमध्ये आपला अर्ज सादर करायचा आहे. विहित कालावधीनंतर सादर झालेल्या अर्जावर विचार होणार नाही याची दक्षता मात्र उमेदवारांनी घ्यायची आहे.

भरतीची जाहिरात पीडीएफ कुठे पाहणार

या भरतीची अधिसूचना अर्थातच जाहिरात पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1xBTe_lTuggRdiD0av0urSy07WmkjPzCM/view या लिंक वर क्लिक करा. 

हे पण वाचा :- ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात निघाली भरती, 35 हजार रुपये पगार मिळणार, वाचा….