अहमदनगर, नासिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह ‘या’ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; भारतीय हवामान विभागाचा अलर्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसापासून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. कारण की, राज्यात आता हवामान कोरडे राहील असे मत हवामान विभागाने व्यक्त केले आहे.

मात्र आज 7 मे 2023 रोजी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांची चिंता अजून मिटलेली नाही. वास्तविक मार्च महिन्यापासून राज्यात अवकाळी पाऊस अन गारपीट होत आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आता पाऊस उघडीप देणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा :- पंजाब डख नवीन अंदाज; आजपासून ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार, काही भागात गारपीट देखील होणार, पहा काय म्हणताय डख

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आयएमडीच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात मात्र आज हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असा अंदाज आहे. यासोबतच कमाल तापमानात देखील आज काही भागात वाढ होण्याची शक्यता आहे. साहजिकच आता उकाडा वाढणार आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक हवामान असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने संबंधित विभागातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; अभ्यास समिती जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीच्या वयाबाबत शासनाला देणार ‘हा’ अहवाल?

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस

आज रविवार 7 मे रोजी कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्र विभागातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात यासोबत मराठवाडा विभागातील संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता राहणार आहे.

यामुळे या संबंधित जिल्ह्याना आयएमडीने येलो अलर्ट दिला आहे. निश्चितच या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडे राहणार असल्याने आता शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी लगबग करतील अशी आशा व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! राज्यातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय, आता…..