सावधान ! महाराष्ट्रातील ‘त्या’ 27 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस; भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Update : देशात येत्या दीड महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर खरीप हंगामाची तयारी सुरू होईल. पण आता खरीप हंगाम दीड महिन्यावर येऊन ठेपला असतानाच सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

उन्हाळा संपण्यासाठी मात्र एका महिन्याचा काळ राहिला आहे. परंतु राज्यात अजूनही अवकाळी पाऊसच पडत आहे. यामुळे यावर्षी उन्हाळ्याची अनुभूती न होता पावसाळ्याचीच अनुभूती होत आहे. यामुळे निश्चितच सामान्य नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत असला तरी देखील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात देखील जवळपास आठ ते नऊ दिवस अवकाळी पाऊस झाला होता.

या चालू एप्रिल महिन्यात देखील जवळपास 15 ते 16 दिवसापासून राज्यात भाग बदलत पाऊस पडतच आहे. काही ठिकाणी तर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे पुणे अहमदनगर जळगाव धुळे नासिक या जिल्ह्यात तुफान गारपीट देखील झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही गारपीटीची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांना निदान आता तरी अवकाळी पावसाने विश्रांती घ्यावी अशी आशा आहे.

मात्र अशातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. कारण की, भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज 28 एप्रिल 2023 रोजी आयएमडीने मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली असून जोरदार पाऊस होणार असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ आजच नाही तर 1 मे पर्यंत असंच हवामान राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळीचा कहर सुरूच राहील अस सांगितलं गेलं आहे.

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?

हवामान खात्याने वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार एक मे 2023 पर्यंत राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया या 11 जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. तसेच काही भागात जोरदार गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

यासोबतच पुणे, सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या 17 जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता कायम राहणार आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी झाला आहे.

म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भातील 11 तसेच उर्वरित राज्यातील 17 अशा एकूण 27 जिल्ह्यात पावसाची तसेच गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच सावधान राहण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी अधिक सजग आणि सतर्क राहून आपली शेती कामे या काळात करायची आहेत.