Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

महाराष्ट्रातील केशरी रेशनकार्डधारक लोकांना आता धान्याऐवजी पैसे मिळणार ! पण असा करावा लागणार अर्ज, नाहीतर…..

Maharashtra Ration Card New Update : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या तसेच सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात.

Maharashtra Ration Card New Update : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या तसेच सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच नवनवीन योजना सुरू केल्या जातात. तसेच काही योजनेमध्ये बदल करून नव्याने योजना सुरू होतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 14 जिल्ह्याच्या एपीएल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला. रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना आता धान्याऐवजी थेट पैसे वितरित करण्याचा हा निर्णय होता. या निर्णयावर मात्र काही लोकांनी आक्षेप नोंदवला तर विरोधकांकडून या निर्णयावर टीका करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी देखील या निर्णयाचा विरोध केला मात्र काही शेतकऱ्यांनी हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी नमूद केला आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेत 11 कोटी; संकटात सापडलेल्या बळीराजाला मिळणार दिलासा, तुम्हाला लाभ मिळाला का? पहा….

दरम्यान शासनाच्या या नवीन निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी 150 रुपये प्रति व्यक्ती प्रति महिना या पद्धतीने पैशांचे वितरण होणार आहे. म्हणजेच वार्षिक 1800 रुपये प्रति व्यक्ती पद्धतीने या योजनेअंतर्गत आता संबंधित शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ हा जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे. मात्र या योजनेअंतर्गत मिळणारी सदर रोख रक्कम महिला कुटुंबप्रमुखाच्या खात्यावरच वर्ग केली जाणार आहे. इतर व्यक्तींच्या खात्यावर या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वर्ग होणार नाही.

कसा आणि कुठे करावा लागणार अर्ज 

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित 14 जिल्ह्यातील ‘आरसीएमएस’वर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांनी डीबीटीसाठी आवश्यक असलेला बँक खात्याचा विहित नमुन्यातील फॉर्म संबंधित तहसिल कार्यालय (पुरवठा विभाग) येथून घ्यावा.

हे पण वाचा :- बातमी कामाची ! ‘शेतकरी असल्याच्या दाखल्या’बाबत झाला मोठा निर्णय; वाचा सविस्तर….

तहसील कार्यालयातून अर्ज प्राप्त केल्यानंतर हा फॉर्म ऑफलाइन भरून अर्जासोबत महिला कुटुंब प्रमुखाच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्डच्या पहिल्या पानाची प्रत, सर्व सदस्यांच्या आधारकार्डची प्रत व विहित नमुन्यातील फॉर्म संबंधित स्वस्तधान्य दुकानदार यांच्याकडे तत्काळ जमा करावा.

या योजनेसाठी आवश्यक अर्ज संबंधित एपीएल रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जमा केला नाही तर त्यांना लाभ मिळणार नाही.

तसेच या योजनेअंतर्गत केवळ महिला कुटुंब प्रमुख यांच्या खात्यातच लाभाचा पैसा वितरित केला जाणार आहे. यामुळे जर संबंधित महिला कुटुंबप्रमुख्याचे बँकेत खाते नसेल तर अशा महिला कुटुंब प्रमुखाचे बँकेत खाते ओपन करावे लागणार आहे. अन्यथा अशा कुटुंबाला या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.

हे पण वाचा :- दहावी, बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी खुशखबर! विमानतळावर काम करण्याची सुवर्णसंधी; भारतीय विमान सेवांमध्ये ‘या’…