Maharashtra State Employee : कष्टाचे झाले चीज! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामाबद्दल मिळालं ‘हे’ गिफ्ट ; शासन निर्णयाची PDF बघा

Maharashtra State Employee : महाराष्ट्र राज्य शासनातील वन सेवेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल प्रोत्साहित करणेहेतू शासनाकडून पदक दिले जाणार आहेत. म्हणजे आता या कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामाचा सन्मान होणार आहे. निश्चितच यामुळे कष्टाचे चीज होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याकरिता तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्याकरिता त्यांना राज्य स्तरावरुन पुरस्कार/ बक्षिसे देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेनुसार वनविभागाच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या वनसंरक्षणार्थ / वन्यजीव संरक्षणार्थ / शोधकार्य / वनव्यवस्थापन / नाविन्यपूर्ण शोध याबद्दल प्रतिवर्षी सुवर्ण व रजत पदके देण्यात येतात.

अशी पदके देण्यापूर्वी वन विभागातील सर्व संबंधित मुख्य वनसंरक्षकांकडून उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या नावांच्या शिफारशी मागविण्यात येतात. सदर शिफारशीस अनुलक्षून त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण कामाचे स्वरुप तसेच त्यांचे गोपनीय अहवाल, सचोटी, चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, बुध्दीमत्ता व त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान इ. बाबींचा विचार करुन पदके प्रदान करण्यासाठी अधिकारी/ कर्मचाऱ्यांची निवड करण्यासंदर्भात प्रधान सचिव (वने) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची बैठक दि. ३०.११.२०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.

Advertisement

या बैठकीत एकूण 23 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पदक देऊन गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने आज महसूल व वन विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे. या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे सन २०१९-२० या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या ६ कार्यप्रकारांसाठी पदके देण्याच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या प्रस्तांवाची तपासणी केल्यानंतर संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल, सचोटी, चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता व त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान इ. बाबी विचारात घेऊन सदरहू प्रस्तावातील एकूण २३ अधिकारी / कर्मचारी यांना पदके देऊन गौरविण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

या अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे देखील सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहेत. तसेच पदके देऊन गौरविण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात या बाबीची नोंद करण्याचे देखील शासन निर्णयात सांगितले गेले आहे. महसूल व वन विभागाचा शासन निर्णय PDF फॉरमॅट मध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Advertisement