Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

धक्कादायक ! राज्यातील ‘या’ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे वेतन रखडले; कारण काय? वाचा…

Maharashtra Teacher Payment : राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल दोन महिन्यांचे वेतन रखडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हाती आलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका संचालित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. दोन महिन्यांचे वेतन या संबंधित कर्मचाऱ्यांचे रखडले असल्याने त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.

यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहावर परिणाम होत आहे. म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर वेतन करावे अशी मागणी केली जात आहे.

हे पण वाचा :- ठरलं ! महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या वाढणार; तुम्ही कोणत्या जिल्ह्यात जाणार? नवीन जिल्ह्याची यादी, पहा…

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, डी. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (भुसावळ), म्युन्सिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (फैजपूर), न. पा. संचालित आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय (सावदा), साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (यावल) या उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे.

दोन महिन्यापासून हातात पैसा येत नसल्याने या कर्मचाऱ्यांना गृह कर्जाचे हप्ते देताना, घरातील सदस्यांचे आजारपण तसेच इतर अन्य खर्च भागवताना अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच मासिक हफ्ते वेळेवर अदा होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना दंड देखील भरावा लागत आहे. एकंदरीत यामुळे देखील त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस पाठोपाठ आता देशात वंदे भारत इलेक्ट्रॉनिक व्हेईकलही धावणार सुसाट; किंमत अन विशेषता आहेत खूपच खास, पहा….

या चार महाविद्यालयात जवळपास 90 पेक्षा अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. आता या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर वेतन मिळावे म्हणून मागणी केली जात आहे. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील इतर खाजगी संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत आहे.

मात्र या नगरपालिका संचालित महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असल्याने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या सोबत हा दुजाभाव का केला जातोय? असा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. निश्चितच या शिक्षक अन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा गंभीर असून लवकरात लवकर या संबंधित कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे अपेक्षित आहे. 

हे पण वाचा :- पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार? ‘या’ 8 तालुक्याचा तयार होणार नवीन शिवनेरी जिल्हा, तालुक्याची आणि गावांची यादी पहा एका क्लिकवर