पावसाळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून एकदा पावसाळ्याला सुरुवात झाली म्हणजे अगदी ओसाड अशा माळरानांवर हळूहळू निसर्गाची हिरवी चादर पसरली जाते व सगळीकडे हिरवीगार असे दृश्य दिसायला लागते. या हिरव्यागार दृश्यामध्ये थंडगार वातावरण, रिमझिमणारा पाऊस, पक्षांचा गोड असा किलबिलाट अनुभवण्यासाठी ट्रीप प्लान करतात. त्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात असलेले धबधबे, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा तसेच पावसामध्ये प्रवास करत असताना भिजून गेल्यावर चहाचा एक एक घोट घेत निसर्गाचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते.
या सगळ्या पावसाळ्यातील निसर्गाच्या सुंदरतेचा अनुभव तुम्हाला देखील घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील मुंबई पुणे पासून जवळ असलेल्या कर्जत तालुक्यातील भिवपुरी या छोट्याशा शहरातील परिसरात जाऊन याची अनुभूती घेऊ शकतात. विशेष म्हणजे या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला अनोखा असा धबधबा देखील पाहायला मिळेल. तुमच्या पावसाची ट्रिप सार्थकी लागेलच परंतु वर्षभर पुरेल एवढी एनर्जी तुम्हाला मिळेल.
भिवपुरी धबधब्याला भेट द्या आणि निसर्गाचा आनंद घ्या
या पावसाळ्यामध्ये तुमचा देखील एखाद्या धबधब्याला आणि निसर्ग पर्यटनाला भेट द्यायची इच्छा असेल तर तुम्ही कर्जत तालुक्यातील भिवपुरी या छोट्या शहरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी निसर्ग सौंदर्याचा व असलेल्या धबधब्याचा आनंद घेऊ शकतात.
तसं पाहायला गेले तर भिवपुरी ही एक छोटेसे गाव आहे व या ठिकाणी एक रेल्वे स्टेशन असून त्याला भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन असे म्हटले जाते व या ठिकाणी उतरून तुम्ही या धबधब्याला भेट देऊ शकतात.
तुम्हाला येथील धबधब्याला भेट द्यायची असेल तर तुम्ही जून ते सप्टेंबर या कालावधीत देऊ शकता. पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण असून या कालावधीमध्ये या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. तसेच हे ठिकाण साहसी पर्यटनासाठी देखील उत्तम आहे.
कारण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी असलेले धबधबे रॅपलिंगसाठी देखील उत्तम आहेत. या धबधब्याचे पाणी सुमारे वीस फुट उंचीवरून खाली कोसळते व खडकावर आदळते. हे दृश्य खूप पाहण्याजोगे असते व मनाला आनंद देते. या धबधब्याच्या थोडे जवळ गेला तर पाण्याचे जे काही फवारे उडतात त्यामध्ये भिजण्याची मजा काही औरच असते.
भिवपुरी धबधब्याला भेट देण्यासाठी कसे जाता येईल?
भिवपुरी रेल्वे स्टेशन पासून पायी प्रवास करत निसर्गाच्या सुंदरता अनुभवण्यामध्ये खूप मजा येते. या ठिकाणी जीकडे पहाल तिकडे तुम्हाला हिरवळच हिरवळ दिसते. डोंगर उतारावर लहान नद्या मोठ्या प्रमाणावर हातात व यांचे सुंदर दृश्य मनाला खूप आनंद देते.
तुम्हाला जर कर्जत वरून भिवपुरी धबधब्याला भेट द्यायची असेल तर सगळ्यात अगोदर कर्जतला उतरल्यावर या ठिकाणचा स्वादिष्ट वडापाव खाऊन मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी. कारण या ठिकाणचा वडापाव खूप प्रसिद्ध आहे.
मुंबईपासून साधारणपणे 102 km आणि पुणे शहरापासून 149 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. जर तुम्हाला रेल्वेने जायचे असेल तर तुम्ही मुंबई सेंट्रल लाईन वर कर्जतला जाणाऱ्या ट्रेन मधून कर्जत पर्यंत प्रवास करू शकता व कर्जत वरून ऑटोस्टॅंडच्या दिशेने पूर्वेकडे चालत जावे आणि पुढे रिक्षाने प्रवास करून धबधब्याकडे जावे.
हा मार्ग त्या ठिकाणी पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्हाला विकेंड ट्रिप प्लॅन करायचे असेल तर तुम्ही कर्जत मध्ये राहू देखील शकतात. कारण या ठिकाणी राहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन जवळ आणि हॉटेल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. जे भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन पासून साधारण 23 किलोमीटर अंतरावर आहे.