खुशखबर ! कल्याण-मुरबाडला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; मुरबाड-नगर आणि मुरबाड-पुणे रेल्वेलाही हिरवा कंदील, राज्यमंत्री कपिल पाटीलची माहिती

Maharashtra Train : महाराष्ट्रासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण मुरबाड रेल्वे बाबत मागणी जोर धरू लागली होती. अशातच आता या रेल्वेमार्गासंदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. एवढेच नाही तर जमीन अधिग्रहणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वेला परिपत्रक देखील पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान कल्याण मुरबाड रेल्वेसाठी निविदा काढणे हेतू जमिनीचे 80% अधिग्रहण होणे गरजेचे असल्याने जमिनीचे आवश्यक अधिग्रहण कम्प्लीट झाल्यानंतर या रेल्वे मार्गासाठी निविदा काढल्या जातील अशी बहुमूल्य माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

एवढेच नाही तर कल्याण मुरबाड हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणे या रेल्वे मार्गासाठी देखील कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली आहे. विशेष बाब अशी की, मंत्रिमहोदयाच्या मागणीवर रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मकतां दाखवण्यात आली आहे. दरम्यान कल्याण मुरबाड मार्गाच्या जमीन अधिग्रहणासाठी दोन दिवसातच मध्य रेल्वेला पत्र पाठवले जाणार आहे.

Advertisement

मग लगेचच निविदा काढल्या जातील आणि या  रेल्वे मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. विशेष म्हणजे जमीन अधिग्रहणासाठी कल्याण आणि मुरबाड येथील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून लवकरात लवकर जमीन अधिग्रहित केली जाईल असं देखील मंत्री महोदय यांनी सांगितलं. पुढील दीड महिन्यात जमीन अधिग्रहणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास यावेळी मंत्र्यांनी व्यक्त केला.

2024 पूर्वीच या रेल्वेचे काम करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या रेल्वे मार्गासाठी 960 कोटी रुपये खर्च होणार असून यापैकी 50% निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पुरवला जाणार आहे. विशेष बाब अशी की, हा रेल्वे मार्ग 1970 पासून प्रलंबित आहे. मात्र या रेल्वे मार्गाला काही कारणास्तव अद्याप मुर्त रूप प्राप्त झालेले नाही.

परंतु आता हा रेल्वे मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी आशा व्यक्त होत आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुरबाड नगर आणि मुरबाड पुणे या रेल्वे मार्गाचे काम देखील जलद गतीने पूर्ण केलं होईल असा विश्वास देखील यावेळी मंत्री महोदय यांनी व्यक्त केला आहे  

Advertisement

बातमी कामाची ! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस विषयी ए टू झेड माहिती एका क्लिकवर

Advertisement