सावधान ! आणखी ‘इतके’ दिवस राज्यातील ‘त्या’ जिल्ह्यात पाऊस पडणार; गारपीटीचीही शक्यता, हवामान विभागाचा गंभीर इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या अवकाळी पाऊस कोसळत आहे. पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर सह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाटासह कोसळणारा हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी मोठा घातक सिद्ध होत आहे. अनेक ठिकाणी विज पडण्याच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे जीवित हानी देखील झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने एक गंभीर इशारा देत आणखी पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात जवळपास 20 मार्चपर्यंत अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आपली, आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

हे पण वाचा :- शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! नवीन पेन्शन योजनेतच ‘जुनी पेन्शन योजने’च्या ‘त्या’ तरतुदी लागू, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सरकार बॅकफुटवर

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सोमवार पर्यंत बहुतांशी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. या कालावधीत वादळी वारा देखील वाहण्याची शक्यता आहे. कोकण वगळता राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज आहे.

या जिल्ह्यात होणार गारपीट 

आज मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार ते सोलापूर पर्यंतच्या पट्ट्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर ते नांदेड पर्यंतच्या पट्ट्यात गारपीटीची शक्यता आहे. विशेष म्हणजे उद्या विदर्भात देखील गारपीट होईल असा अंदाज बांधला जात आहे.

हे पण वाचा :- गुढीपाडव्याला मिळणारा आनंदाचा शिधा नेमका कधी वितरित होणार? वाचा याविषयी सविस्तर

या जिल्ह्यात पडणार पाऊस 

राज्यात पुढील तीन दिवस मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर, नंदूरबार, विदर्भ, मराठवाडा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगरसह इत्यादी जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे. 

निश्चितच राज्यात जवळपास सर्व दूर पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सतर्क रहावे लागणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडत आहे. नासिक सह अहमदनगर, पुणे मध्य महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. उत्तर महाराष्ट्रात, विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पाऊस पडत आहे. कोकणात मात्र इतर विभागाच्या तुलनेत कमी पाऊस आहे. 

हे पण वाचा :- चर्चा तर होणारच ! डॉक्टराने चक्क गाईच्या वासराच केल शाही बारस; अख्या परिसरात रंगली या शाही सोहळ्याची चर्चा