शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; ‘या’ तारखेपर्यंत पाऊस अन गारपीट सुरूच राहणार, हवामान विभागाने जारी केला नवीन अंदाज, दिला गंभीर इशारा

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या राज्यभर पाऊस पडत आहे. बहुतांशी जिल्ह्यात गारपीटही झाली आहे. यामुळे रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच फळबाग आणि भाजीपाला वर्गीय पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

धुळे जिल्ह्यात तर चक्क लिंबूच्या आकाराच्या गारा पडल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सध्या कोसळत असलेला विजांच्या कडकडाटासह अन वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे विज पडण्याच्या घटना घडतं आहेत.

हे पण वाचा :- बातमी कामाची! शिंदे-फडणवीस सरकारला गोत्यात आणणारी जुनी पेन्शन योजना नेमकी आहे तरी कशी?, वाचा

Advertisement

परभणी जिल्ह्यात वीज पडून चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम आहे. 20 मार्चपर्यंत राज्यात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवार पर्यंत संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आज देखील कोकण वगळता जवळपास सर्वच भागात पाऊस पडेल असं मत हवामान विभागाने वर्तवल आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात पावसाची शक्‍यता आहे.

हे पण वाचा :- मुंबई-बीड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कर्जत तालुक्यात ठप्प; ‘या’ कारणाने कामबंद, रस्ते प्राधिकरण विभागाची माहिती

या जिल्ह्यात पडणार पाऊस

Advertisement

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड तसेच विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक शिवाय मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. दरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. वीज पडण्याच्या घटना वाढल्या असल्याने शेतकऱ्यांना पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला दिला जात आहे. झाडाखाली पाऊस सुरू असताना थांबू नये असं देखील सांगितलं जात आहे.

हे पण वाचा :- कौतुकास्पद ! 71 वर्षीय शेतकऱ्याने माळरानावर फुलवला ड्रॅगन फ्रुटचा मळा; झाली लाखोंची कमाई, युट्युबवरून घेतला धडा

सोबतच शेतकरी बांधवांना आपल्या पशुधन वीज पडण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षित ठिकाणी बांधण्याचा सल्ला दिला आहे. एकंदरीत 20 मार्च 2023 पर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे. त्यानंतर मात्र राज्यात पावसाची उघडीप राहील अशी शक्यता आहे. निश्चितच सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कर्मचाऱ्यांचा संप पाहता नुकसानीचे पंचनामे देखील अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मंजूर करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

Advertisement

हे पण वाचा :- शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! नवीन पेन्शन योजनेसंदर्भात…