Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! अवकाळीच संकट अजून गेलेल नाही; ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस आणि गारपीट

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा धक्कादायक आणि अतिशय चिंताजनक बातमी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा धक्कादायक आणि अतिशय चिंताजनक बातमी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मार्च महिन्यात म्हणजेच 04 मार्च ते 8 मार्च दरम्यान आणि 16 मार्च ते 19 मार्च दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. या कालावधीत कोसळलेला पाऊस हा रब्बी हंगामातील पिकांसाठी मोठा घातक ठरला.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरं पाहता, मार्च महिन्यात रब्बी हंगामातील बहुतांशी पिकांची हार्वेस्टिंग केली जाते. प्रामुख्याने हरभरा आणि गहू या पिकांची हार्वेस्टिंग मार्च महिन्यापासून सुरू होते. म्हणजे ऐन काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांसाठी हा अवकाळी पाऊस आणि गारपीट मोठी घातक ठरली आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

हे पण वाचा :- अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शिंदे सरकारने दिली 63 कोटींची मदत; केव्हा खात्यात जमा होणार? पहा…..

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मात्र दोन दिवस अवकाळी पावसाने उघडीप दिली यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीवाला होता. मात्र पावसाची ही उघडीप अधिक काळ राहिली नाही. पुन्हा राज्यात पावसाला सुरुवात झाली. यामुळे गेल्या महिन्यात अवकाळीपासून बचावलेली थोडेफार पिके एप्रिल महिन्यात सध्या होत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे जवळपास क्षतीग्रस्त झाली आहेत.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी सार्वजनिक केली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता व्यक्त केली आहे.

हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी मोठी भरती सुरु, अर्ज कुठं करणार, पहा…..

कुठं पडणार पाऊस कुठं होणार गारपीट?

हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे तसेच गारपीट देखील होणार आहे. म्हणजे जवळपास 17 एप्रिल पर्यंत राज्यात पावसाची आणि गारांची शक्यता कायमच राहणार आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, 12 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत म्हणजेच आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यात गारपीट होणार आहे.

12 ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये मध्य महाराष्ट्रात गारपीट होईल, 13 एप्रिल रोजी कोकणात गारपीटीची शक्यता असेल आणि 14 एप्रिल रोजी मराठवाड्यात गारपीट होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. निश्चितच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने शेतकऱ्यांना अधिक सतर्क आणि सजग राहण्याची गरज यावेळी निर्माण होत आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक, नंदूरबार, धुळे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात गारपीटीची शक्यता; भारतीय हवामान विभागाची माहिती