मोठी बातमी ! राज्यातील जिल्हा परिषद नोकरभरती साठी परीक्षेचे स्वरूप झाले जाहीर; किती प्रश्न राहतील, गुण किती, कशी राहणार प्रश्नपत्रिका? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra ZP Recruitment : राज्यातील नवयुवक तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात लवकरच जिल्हा परिषद अंतर्गत नोकर भरती केली जाणार आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये 18000 हून अधिक पदे रिक्त आहेत. अशा परीस्थितीत या पदांसाठी भरती होणे अपेक्षित होते. त्यानुसार आता ही भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे.

वास्तविक 2016 पासून जिल्हा परिषद अंतर्गत नोकर भरती झालेली नाही. यामुळे रिक्त पदांची संख्या ही मोठी आहे. अशातच आता ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून या नोकर भरतीसाठी आवश्यक असलेल्या परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार

ग्रामविकास विभागाने या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका कशी राहणार, कोणत्या विषयांचा यामध्ये समावेश राहील, यासाठी किती गुण राहतील, यात किती प्रश्नांचा समावेश राहील याबाबत महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे. म्हणून आज आपण ही सर्व माहिती काटेकोरपणे जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षेसाठी विभागानुसार म्हणजेच संवर्गानुसार वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका राहणार आहेत. या परीक्षेमध्ये दहावी, बारावी, पदवी आणि संबंधित पदाच्या व्यवसायिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न राहतील अशी माहिती देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- कडू कारल्याचा मधुर गोडवा ! प्रयोगशील शेतकऱ्याने 10 गुंठ्यात सुरु केली कारल्याची शेती, 2 लाखांची झाली कमाई, पहा ही यशोगाथा

कशी राहणार प्रश्नपत्रिका?

या परीक्षेत एकूण 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. अर्थातच एका प्रश्नाला दोन मार्क राहणार आहेत. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमापन आणि तांत्रिक विषयाशी संबंधित प्रश्नांचा समावेश राहणार आहे. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना, परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना दोन तासांचा वेळ दिला जाणार आहे. 

कोणत्या विषयाला किती गुण मिळणार?

या परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान गणित व बुद्धिमापन  या चार विषयांचे प्रत्येकी 15 प्रश्न राहणार आहेत. म्हणजेच या चारी विषयांचे प्रत्येकी 30 मार्कांसाठी प्रश्न या परीक्षेत राहतील. अर्थातच या चारी विषयांसाठी 120 गुण राहणार आहेत.  यासोबत तांत्रिक विषयाचे प्रश्न 40 राहणार आहेत म्हणजेच तांत्रिक विषयासाठी 80 मार्क राहतील. अशा पद्धतीने एकूण 200 गुणांसाठी 100 प्रश्न या परीक्षेत  राहणार आहेत.

हे पण वाचा :- म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी आज निघणार; घरबसल्या म्हाडाची सोडत कशी पाहणार? पहा….

या जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी चार प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. अ, ब१, ब२ आणि क असे चार प्रकार परीक्षेचे राहणार आहेत. यात पहिल्या प्रकारात विविध ११ पदे, दुसऱ्या प्रकारात १० पदे, तिसऱ्या प्रकारात एक आणि चौथ्या प्रकारात १७ अशी एकूण विविध ३९ पदे भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

एकंदरीत आता जिल्हा परिषद अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना आत्तापासूनच परीक्षेसाठी तयारीला लागावे लागणार आहे. 2016 पासून जिल्हा परिषद अंतर्गत नोकर भरती झालेली नाही यामुळे या पदभरतीसाठी लाखो विद्यार्थी तयारी करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने लवकरच या परीक्षेचे स्वरूप जाहीर केले आहे. आता परीक्षेचे स्वरूप जाहीर झाले असल्याने उमेदवारांना एक रोडमॅप मिळाला आहे आणि आता या रोडमॅप नुसार उमेदवार अभ्यासाला लागतील यात तीळ मात्र देखील शंका नाही.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आता तालुका स्तरावरही हवामान अंदाज मिळणार, सर्व्यात आधी ‘या’ दोन जिल्ह्यात होणार सुरवात, वाचा….