राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ! मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच – बाळासाहेब थोरात

Ahmednagarlive24
Published:

नीलेश लंके हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले. परंतु, पारनेरमध्ये सरकारकडून निर्माण केलेली दहशत यामुळे नीलेश लंके यांनी विखे यांना मोठी टक्कर देऊन विजय मिळवला आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत असून, तो देशाच्या विकासाचा विचार आहे. त्याला ताकद देण्याचे काम सर्वांनी करायचे आहे.

अहमदनगरमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी ज्या पद्धतीने दहशतीचे राजकारण करून चुकीचे प्रशासन राबवले, याबद्दल जिल्ह्यात मोठा रोष निर्माण झाला. जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले असून, अजून काही बाकी आहे तेही उडणार आहे, असे माजी महसूलमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

नीलेश लंके आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयाचा संगमनेरात जल्लोष करण्यात आला. दरम्यान, आमदार थोरात यांनी त्यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, देशपातळीवर भाजपकडून होत असलेले द्वेषभावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य झालेले नाही, याविरुद्ध जनतेने कौल दिला आहे.

महाविकास आघाडीला भक्कम साथ देत सरकारविरोधी रोष व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात मंत्री विखे यांच्याकडून होत असलेले दहशतीचे राजकारण व चुकीच्या प्रशासनामुळे त्यांचा पराभव झाला.

देशातील सध्याचे राजकारण आणि राज्यपातळीवर चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार याविरोधात जनतेमध्ये अत्यंत रोष आहे. जनतेला असे चुकीचे राजकारण मान्य नसून मतदानातून जनतेने तो राग व्यक्त केला आहे.

सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला सत्तेचा गैरवापर, त्याचप्रमाणे वाढलेली बेरोजगारी, महागाई, भरतीमधील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत गैरव्यवहार, राज्यात बिघडलेली शांतता, सुव्यवस्था यामुळे जनता या सरकारवर नाराज आहे.

भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार नसतानाही सातत्याने जनतेमध्ये संपर्कात होते. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमातून ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार
महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले. परंतु, पारनेरमध्ये सरकारकडून निर्माण केलेली दहशत यामुळे नीलेश लंके यांनी विखे यांना मोठी टक्कर देऊन विजय मिळवला आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत असून, तो देशाच्या विकासाचा विचार आहे.

त्याला ताकद देण्याचे काम सर्वांनी करायचे आहे. राज्यात महाविकास आघाडीला मोठे अनुकूल वातावरण असून, आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे
सरकार येणार असून, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणार आहे. – बाळासाहेब थोरात, आमदार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe