Mahavitaran job:- सध्या विविध विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जात असून विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी या कालावधीत उपलब्ध झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच दहावी आणि बारावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी देखील विविध प्रकारच्या नोकरीच्या शोधात असतात.
त्यामुळे तुम्ही देखील बारावी पास असाल व नोकरी शोधत असाल तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण च्या माध्यमातून नोकरीची एक सुवर्णसंधी चालून आली असून महावितरणच्या माध्यमातून विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
महावितरणमध्ये होत आहे 5 हजार 347 रिक्त पदांसाठी भरती
महावितरणच्या माध्यमातून 5347 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून ही भरती विद्युत सहाय्यक या पदासाठी राबवली जाणार आहे. त्यामुळे जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील असे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने याकरिता अर्ज करू शकतात.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता
महावितरणच्या माध्यमातून राबवली जाणारी विद्युत सहाय्यक या पदासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून किमान बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे व महत्वाचे म्हणजे उमेदवाराकडे संबंधित ट्रेडचे आयटीआयचे सर्टिफिकेट असावे.
वयोमर्यादा किती?
महावितरणच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक या पदासाठी राबविल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया करिता इच्छुक व पात्र उमेदवाराची वयोमर्यादा ही किमान 18 ते कमाल 27 वर्ष दरम्यान असावे.
प्रवर्गनिहाय उपलब्ध रिक्त पदे
1- अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण 673 जागा
2- अनुसूचित जमाती प्रवर्ग एकूण 491 जागा
3- विमुक्त जाती(अ) प्रवर्ग एकूण 150 जागा
4- भटक्या जाती(ब) प्रवर्ग एकूण 145 जागा
5- भटक्या जाती(क) प्रवर्ग एकूण जागा 196
6- भटक्या जाती(ड) प्रवर्ग एकूण जागा 108
7- विशेष मागास प्रवर्ग एकूण जागा 108
8- इतर मागास प्रवर्ग एकूण जागा 895
9- इडब्ल्यूएस एकूण जागा 500
10- खुला प्रवर्ग एकूण जागा 2081
किती लागेल शुल्क?
या भरतीसाठी अर्ज शुल्क हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 अधिक जीएसटी व मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अनाथ घटकातील उमेदवारांना 125 रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल.
काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
महावितरणच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या भरतीसाठी ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करायचे आहे ते 20 जून 2024 पर्यंत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठीचा अर्ज महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/ यावर करता येणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल मानधन?
या भरतीमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी भरती झालेल्या उमेदवारांना प्रथम वर्षाकरिता 15000, द्वितीय वर्षाकरिता 16 तर तृतीय वर्षाकरिता 17 हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे.