Maruti Baleno Loan EMI : दोन लाख रुपये भरा आणि मारुती बलेनोचे टॉप मॉडेल घरी घेऊन जा ! भरावा लागेल इतका EMI

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Auto News:-  भारतामध्ये अनेक कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्या असून यामध्ये मारुती सुझुकी ही एक प्रसिद्ध कंपनी आहे. मारुती सुझुकी कंपनीचे अनेक टॉप कार मॉडेल असून विक्रीच्या दृष्टिकोनातून देखील या कार अव्वल आहेत. परवडणाऱ्या दरामध्ये कारची निर्मिती ही मारुती सुझुकीचे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

आतापर्यंत त्या कंपनीने अनेक टॉप असे कार मॉडेल बाजारपेठेमध्ये आणलेले असून मारुती सुझुकी चे बलेनो हे टॉप कार मॉडेल आहे. ही दहा लाख रुपये किंमत रेंज मधील एक आवडती व सर्वाधिक विक्री होणारी मारुती सुझुकीची कार आहे. ही कार जर तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर तुम्ही दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करून ती घरी आणू शकतात. याबद्दलची महत्वाची माहिती आपण घेऊ.

 दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करून आणा मारुती सुझुकीची बलेनो

याबद्दल सविस्तर वृत्त असे की मारुती सुझुकी कंपनीची प्रीमियम हॅचबॅक बलेनो ही भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी कार असून अल्फा मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही सर्वात जास्त विक्री होणारी मारुती सुझुकीची कार आहे. जर तुम्हाला ही कार विकत घ्यायची असेल तर तुम्ही आता दोन लाख रुपयांच्या डाऊन पेमेंट सोबत सोप्या पद्धतीने या कार साठी फायनान्स करू शकतात.

या प्रीमियम हॅचबॅक करिता नेक्सा डीलरशिप चा एक उत्तम लुक तसेच आधुनिक वैशिष्ट्ये व उत्तम मायलेज असल्यामुळे आता खरेदी करणाऱ्यांची गर्दी होत आहे. आज कालच्या फायनान्सच्या ट्रेंडमध्ये तुम्ही मारुती बलेनो अल्फा मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंट मॉडेल दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करून खरेदी करू शकतात.

 या कारची वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी बलेनो कार हे भारतीय बाजारामध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या चार ट्रिम लेवलमध्ये एकूण 9 व्हेरियंट मध्ये विक्री केली जाते. या कारची किंमत सहा लाख 61 हजार ते नऊ लाख 88 हजार रुपये एक्स शोरूम इतकी आहे. विशेष म्हणजे या कारला सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे.

आपण या कारचा मायलेज चा विचार केला तर पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 22.94 किमी पर लिटर असून बलेनो सीएनजी चे मायलेज 30.61 किलोमीटर पर केजी आहे. या कारला दर्जेदार स्वरूपाचे इंटेरियस, नऊ इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले सपोर्ट, रिव्हर्स कॅमेरा तसेच हेडअप डिस्प्ले, पुश स्टार्ट अँड स्टॉप बटन तसेच 360 डिग्री कॅमेरा आणि क्रूज कंट्रोल देण्यात आलेले आहे.

 या कारवरील फायनान्सचा तपशील

मारुती सुझुकीच्या बलेनो अल्फा मॅन्युअल पेट्रोल वेरियंटची किंमत 9.33 लाख एक्स शोरूम आणि ऑन रोड किंमत ही दहा लाख 45 हजार 401 रुपये इतकी आहे. समजा तुम्ही जर ही कार खरेदी करण्याकरिता दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला साधारणपणे नऊ लाख 45 हजार 401 रुपये इतके कर्ज घ्यावे लागेल. पाच वर्ष कालावधीचे हे कर्ज राहील व यावरचा व्याजदर 9% आहे. ही कर्जफेड करण्यासाठी तुम्हाला साठ महिन्यांकरिता  प्रति महिना 19 हजार 625 रुपये इतका हप्ता भरावा लागेल. म्हणजेच ही सगळी आकडेवारी पाहिली तर मारुती बलेनो अल्फा मॅन्युअल व्हेरिएंटच्या फायनान्स करिता तुम्हाला दोन लाख 32 हजार रुपये व्याज लागेल.