म्हाडा मुंबई मंडळ लॉटरी : मध्यम गटातील ‘या’ सदनिका सोडतीमधून वगळल्या, कारण काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada Mumbai Lottery News : 2019 पासून म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीची नागरिकांकडून आतुरतेने वाट पाहिली जात होती. शेवटी म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2023 मध्ये गेल्या महिन्यात 4 हजार 83 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे.

यासाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सध्या सुरू असून नागरिकांच्या माध्यमातून या घर सोडतीला चांगला प्रतिसाद दाखवला जात आहे. या सोडतीमध्ये लाखो अर्ज दाखल होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे.

म्हाडा मुंबई मंडळाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षानंतर ही लॉटरी निघाली असल्याने नेहमीच्या तुलनेत या लॉटरीला अधिक पसंती मिळेल असं म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केल आहे. दरम्यान या लॉटरी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आमच्या हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 हजार 83 घरांसाठी निघालेल्या लॉटरीतून एक घर वगळण्यात आले आहे. यामुळे आता ही लॉटरी 4 हजार 82 घरांसाठी राबवली जाणार आहे. या लॉटरी मध्ये समाविष्ट असलेल्या मध्यम गटातील दादर येथील एका घरावर (संकेत क्रमांक ४६१) बृहतसूचीतील (मास्टरलिस्ट) रहिवाशाने दावा करीत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

म्हणून दादर मधील हे घर लॉटरी मधून वगळण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक म्हाडा मुंबई मंडळाच्या माध्यमातून शनिवारी अर्थातच काल 3 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.

कुठं आहे हे घर

हे सोडती मधून वगळण्यात आलेले घर दादर परिसरातील (मध्यम गट – संकेत क्रमांक ४६१) सावित्री निवास आणि लक्ष्मी निवासमध्ये आहे. आता या घरासाठी इच्छुक असलेल्यांना आता अर्ज करता येणार नाही.

अशा परिस्थितीत आता या घरासाठी ज्या लोकांनी अर्ज केला आहे त्या लोकांचे काय करायचे या संदर्भात काय निर्णय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, सोमवारी या संदर्भात म्हाडा मुंबई मंडळाच्या माध्यमातून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंडळाच्या सह मुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी दिली आहे.