आनंदाची बातमी ! म्हाडाच्या कोकण मंडळाची पुन्हा नवीन सोडत निघणार; डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार येथे घर होणार उपलब्ध, केव्हा निघणार जाहिरात?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : मुंबई शहरात किंवा महानगर प्रदेशात गेल्या काही दशकात घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य घर घेण्यासाठी कायमच म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात.

दरम्यान, म्हाडाच्या कोकण मंडळांनी मुंबई महानगर प्रदेशात घरांसाठी नुकतीच सोडत प्रक्रिया काढली आहे. यानुसार आता अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाली असून पहिली प्रारूप यादी, अंतिम यादी देखील जाहीर झाली आहे.

तसेच 10 मे 2023 रोजी ठाणे येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता लॉटरी देखील निघणार आहे. मात्र यावेळी कोकण मंडळातील लॉटरीला नागरिकांनी खूपच कमी प्रतिसाद दाखवला आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सोयाबीन दरात झाली वाढ, पहा बाजारात काय सुरु आहे?

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमानुसार आता नागरिकांना सर्व कागदपत्रांची पूर्तता आधी करावी लागते. त्यामुळे अनेक लोकांना म्हाडाच्या या लॉटरी साठी कागदपत्रांअभावी अर्ज करता आला नाही. यामुळे आता म्हाडा पुन्हा एकदा कोकण मंडळासाठी लॉटरी काढणार आहे.

कोकण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी याबाबत एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दिवाळीत म्हाडा कोकण मंडळ पुन्हा एकदा नवीन लॉटरी काढली जाणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना मुंबई महानगर प्रदेशात घर घ्यायचे असेल अशा लोकांच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

हे पण वाचा :- देशातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रात ! ‘या’ दोन शहरातील प्रवास फक्त 15 मिनिटात, 12 किलोमीटरच्या अंतरासाठी 14 हजार कोटींचा खर्च, पहा….

एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोकण मंडळ येत्या दिवाळीत डोंबिवली येथील प्रकल्पाचे 621 घरे, वसई, विरार, नवी मुंबई आणि ठाणे येथील 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरे तसेच जी घरे कोकण मंडळाच्या या चालू लॉटरी मधून अनसोल्ड राहतील त्या घरांना देखील या दिवाळीतील लॉटरीमध्ये समाविष्ट करणार आहे.

अर्थातच आता डोंबिवलीजवळील कल्याण तालुक्यातील घारीवली आणि उसरगाव परिसरात, वसई विरार, नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी कोकण मंडळाकडून लवकरच घर उपलब्ध होणार आहेत. यामुळे आता इच्छुक नागरिकांना या घरांसाठी आत्तापासूनच पैशांची जमवाजमव करावी लागणार आहे तसेच आवश्यक कागदपत्रे आतापासूनच रेडी करून ठेवावी लागणार आहेत.

हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ 5 रुपयाचा स्टॉक पोहचला 590 रुपयावर, 78 हजाराचे बनलेत 1 कोटी; पहा डिटेल्स