Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

चिंताजनक ! हवामानात झाला मोठा बदल; बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाची शक्यता, ‘या’ तारखेला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Mocha Cyclone : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. राज्यातील पुणे, अहमदनगर , नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आज देखील राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय तळकोकणात देखील आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

दरम्यान आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रीवादळाला मोचा या नावाने ओळखले जाणार आहे.

हे पण वाचा :- मुंबईमधील मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनाचा मोठा निर्णय, आता…..

बंगालच्या उपसागरात मान्सून पूर्व तयार होणारं हे पहिलंच चक्रीवादळ राहणार आहे. यामुळे देशातील बहुतांशी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आधीच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि आता या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचा चिंतेत भर पडली आहे.

युएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टम यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ 11 मे ते 15 मे दरम्यान बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हे चक्रीवादळ पाच मे ते 11 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे. विशेष बाब म्हणजे या गोष्टीला भारतीय हवामान विभागाने देखील दुजोरा दिला आहे.

हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! इस्रो मध्ये निघाली भरती, आजच करा अर्ज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण बंगालच्या उपसागरात 5 मेच्या सुमारास डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे. या डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते असे मत आयएमडीने व्यक्त केले आहे. सध्या भारतीय हवामान विभाग बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे.

11 मे ते 13 मे दरम्यान हे चक्रीवादळ म्यानमार तसेच बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.यादरम्यान बांगलादेशच्या किनारपट्टीवर 150 ते 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

निश्चितच, गेल्या महिन्यात आणि या चालू महिन्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आता या मोचा चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात धोक्याची घंटा वाजली आहे.

हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच ! ‘या’ तारखेला जाहीर होणार 10वी, 12वी चे निकाल, वाचा सविस्तर