Monsoon Update : एप्रिल महिना आता जवळपास संपत चालला आहे. येत्या दोन दिवसात एप्रिल महिना संपणार असून मे महिन्याला सुरुवात होईल. म्हणजेच आता मान्सून मात्र एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. एक ते सव्वा महिन्यात मान्सूनला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू केली आहे.
मात्र, अशातच हवामान तज्ञांकडून मान्सून 2023 बाबत एक मोठा भाकीत वर्तवलं जात आहे. वास्तविक, गेल्या मार्च महिन्यापासून राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवल आहे. मार्च महिन्यात जवळपास 9 ते 10 दिवस अवकाळी पाऊस झाला होता. तसेच गेल्या महिन्यात अधिकतर काळ ढगाळ हवामान होते. या चालू एप्रिल महिन्यात देखील जवळपास गेल्या वीस दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे.
हे पण वाचा :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘असं’ बेशिस्त वर्तनुक केल्यास बसणार मोठा भुर्दंड, परिपत्रक जारी, वाचा
राज्यात भाग बदलत पावसाची हजेरी लागत आहे. विशेष बाब म्हणजे पुढील मे महिन्यात देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. याचा मात्र आगामी मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मान्सून काळात कमी पर्जन्यमान राहणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात देखील असाच पाऊस पडला तर मान्सूनवर विपरीत परिणाम होईल.
पर्जंन्यमान कमी राहील किंवा मान्सून काळात पावसाचा खंड राहू शकतो. आधीच भारतीय हवामान विभागाने यावर्षी जेमतेम पाऊस पडणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता मे महिन्यात कसं हवामान राहत यावरच आगामी मान्सूनचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
हे पण वाचा :- नादखुळा ! उच्चशिक्षित तरुणाने सुरु केली अंजीर शेती; 30 गुंठ्यात मिळवले 10 लाखाचे उत्पन्न, असं केलं नियोजन
मान्सून बाबत चंद्रपूरचे हवामान तज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी सकाळ वृत्त समूहाला दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनचा पाऊस साधारणपणे उन्हावर अवलंबून असतो. विदर्भात जेवढे कडक ऊन व जमीन तापेल, तेवढा पावसाळ्यात अधिक पाऊस पडतो. पण यंदा उन्हाळ्यात कमी प्रमाणात ऊन राहिले आहे.
यामुळे याचा परिणाम आगामी मान्सूनवर होण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत आता पुढील महिन्यात देखील पाऊस पडला तर याचा विपरीत परिणाम मान्सूनवर होईल आणि यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- पंजाब डख यांचा आजचा हवामान अंदाज : येत्या काही तासात ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर